Suicide rates : जगभरातील आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी पाहिली तर यामध्ये पुरुषांची संख्या सर्वात जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगातील प्रत्येक 1 लाख पुरुषांमधील 2.6 पुरुष हे आत्महत्या करुन जीवन संपवतात. तर 1 लाख महिलांमधील 5.4 महिला त्यांच्या आयुष्याचा शेवट आत्महत्येने करतात. एनसीआरबीच्या 2022 च्या आकडेवारीनुसार, 30 ते 45 वर्षांच्या वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त. तर 18 ते 30 आणि 45 ते 60 या वयोगटातील लोकांमध्येही आत्महत्या करण्याचे प्रमाण दिसून येते. 


बंगळूरमध्ये इजिनिअरची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या


बेंगळुरू येथील एका कंपनीत  इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाष मोदी याने मंगळवारी आत्महत्या केली. त्महत्येपूर्वी त्याने सुमारे 1 तास 20 मिनिटांचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. 24 पानांची सुसाईड नोटही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी पत्नी निकिता सिंघानिया आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.


सुसाईड नोटमध्ये अतुल म्हणाला की, निकिता आणि तिच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचार, खुनाचा प्रयत्न, हुंडाबळीसाठी छळ यासह 9 गुन्हे दाखल आहेत. अतुल आणि निकिता यांचे 2019 मध्ये लग्न झाले होते. अतुलने सांगितले की, लग्न झाल्यापासून निकिता आणि तिचे कुटुंबिय त्याच्याकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने पैसे मागत होते.


व्हिडिओमध्ये अतुल म्हणाला की, मला आत्महत्या करावी वाटते, कारण मी पैसे कमावतो. त्यामुळे माझ्या शत्रू आणखी ताकतवान होते आहेत. माझ्या करातून मिळालेल्या पैशातून न्यायालय आणि पोलीस यंत्रणा मला, माझ्या कुटुंबाला आणि चांगल्या लोकांना त्रास देतील. अतुलवर त्याची पत्नी आणि नातेवाईकांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे त्याला आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले, असेही बोलले जात आहे. 


आत्महत्या हे जगभरातील मृत्युंचे तिसरे प्रमुख कारण 


आत्महत्येसारखे ठोस पाऊल उचलणारा अतुल सुभाष एकटा नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार जगभरात दरवर्षी 7 लाखांहून अधिक लोक आत्महत्या करतात. आत्महत्या हे जगभरातील मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. एकट्या भारतात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत खूपच जास्त आहे.


दोन दशकांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतातील प्रत्येक 10 आत्महत्यांपैकी 6 किंवा 7 पुरुष आहेत. 2001 ते 2022 या कालावधीत दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या महिलांची संख्या 40 ते 48 हजार दरम्यान होती. तर याच काळात आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या 66हजारांवरून 1 लाखाच्या पुढे गेली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Gadchiroli Crime : स्वत:ची बंदुक हाताळताना 8 राऊंड फायर झाले, 3 गोळ्या छातीत घुसल्या, न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाने जीव गमावला