एक्स्प्लोर

राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती देत, पुढील वाटचालीसाठी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधूनच दिशा निश्चित करण्यात आली आहे.

अहिल्यानगर : राज्यातील दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून बारामती आणि राहुरी (Rahuri Election) मतदारसंघातील निवडणुकांसाठी उद्या म्हणजेच 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी दोन्ही मतदारसंघात महायुतीची जाहीर सभा संपन्न झाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही उमेदवारांसाठी मतदानाचं आवाहन केलं. विशेष म्हणजे राहुरी मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंना (Prajakt tanpure) उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतल्यानंतर तसेच मुख्यमंत्र्‍यांनी फोनवरुन बोलणे केल्यानंतर त्यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने येथून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. आता, ऐन मतदानाच्या आदल्यादिवशी तनपुरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत आपली भूमिका निश्चित केली आहे. 

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती देत, पुढील वाटचालीसाठी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधूनच दिशा निश्चित करण्यात आली आहे. संयम, एकता आणि सत्य माहितीवर विश्वास ठेवूया, अफवांपासून दूर राहा असे म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने निवेदनही जाहीर केलं आहे. त्यामुळे, तनपुरे यांची भूमिका काय असा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. कारण, आपल्या निवेदनात त्यांनी कोणत्या उमदेवाराच्या पाठीशी आपण आहोत, हे जाहीर केले नाही. 

प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या फेसबुकवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यात "राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून मी माघार घेण्याचा निर्णय का घेतला, याची माहिती आपणा सर्वांना आहेच. हा निर्णय परिस्थितीचा सखोल विचार करून आणि सर्व घटकांचा आदर राखून घेतलेला आहे. तसेच, पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यापूर्वी गावागावातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याशी सविस्तर चर्चा करण्याचे मी ठरवले होते. त्या अनुषंगाने मी सर्व संबंधितांशी संवाद साधला असून, त्यांच्या मतांचा आदर ठेवून पुढील दिशा निश्चित केली आहे. मला माहित आहे की, अनेकजण पुढील भूमिकेबाबत विचारणा करत आहेत. अशावेळी आपण सर्वांनी संयम बाळगून, स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करावी आणि त्यांच्या निर्णयाचा सन्मान करावा,  कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका". असे आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या पोस्टमधून केले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत तनपुरे यांची भूमिका भाजपला पूरक अशीच राहिली आहे. 

भूमिकेचा संभ्रम कायम, कार्यकर्त्यांना सूचक संदेश (Prajakt tanpure rahuri election)

दरम्यान, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी माध्यमांना सांगणं टाळलं आहे. त्यामुळे, या पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांची भूमिका ही शेवटपर्यंत संभ्रमात राहिली आहे. त्यांनी उघडपणे कोणाला पाठींबा दिला नाही, मात्र कार्यकर्त्यांना सूचक संदेश दिला तो देखील ऐनवेळी दिला असल्याने त्यांचे कार्यकर्ते हे प्रचारात दिसले नाहीत. आता, गुरुवारी मतदान करताना त्यांचे कार्यकर्ते कुणाला मतदान करणार किंवा कोणाला पाठींबा देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे अन्...; बीड तुरुंगातील ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप, थेट इशारा

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget