PM Narendra Modi, Delhi : "पहिल्यांदा आमच्या सरकारमुळे एका गुर्जर मुस्लीमाला मंत्रिपद मिळालं आहे. आमच्या मंत्रिमंडळात रेकॉर्ड ओबीसी (OBC) संख्येने मंत्री आहेत.मला दक्षिण भारतात जे प्रेम, स्नेह मिळालाय. त्याचे मी शब्दात वर्णन करु शकत नाही. राजकीय पंडितांना कधी हे समजू शकणार नाही",असे मत पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केले. दिल्लीत(Delhi) भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी पीएम मोदींनी (Narendra Modi)  कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. 


पंतप्रधान मोदी म्हणाले, पूर्वी पूर्वोत्तर भारताकडे दुर्लक्ष केलं जायचं,कारण तिथे जागा आणि मत कमी आहेत.आम्ही त्याचा विचार करत नाहीत. त्या भागात अनेक मंत्र्यांचे प्रवास लावले. मंत्र्यांना मायनस १५ डिग्री तापमानात राहावं लागलं. कर्तारपुर कॉरिडॉर आम्ही उघडला. शाहाजाद्यांचे बलिदान आम्ही वीर बाल दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. पूर्वी आमचे शीख बांधव दुर्बिणीतून कर्तारपुरचे दर्शन घ्यायचे. आज शीख बांधव तिथे जातात. गुरुग्रंथसाहिब आम्ही अफगाणिस्तान मधून आणला, असेही पीएम मोदींनी यावेळी बोलताना नमूद केले. 


पीएम मोदींची काँग्रेसवर टीका


काँग्रेसने सैन्यादलाचे मनोबल तोडले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स विकणार म्हणून यांनी प्रचार केला.HAL च्या बाहेर फोटो काढायला गेले. आज त्याच HAL चा डिमांड वाढली आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक नंतर भारतीय लष्कराच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित केले, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आम्ही शतकांची प्रतीक्षा संपवली, राम मंदिर बनवलं, धर्मध्वजा फडकवली. अंदमान नामकरण केलं. दांडी येथे स्मारक बनवला. सरदार पटेलांना समर्पित statue of unity तयार केलं.१४ ऑगस्ट विभाजन विभिषिका दिवस आम्ही घोषणा केली.


अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर आणली


मोदी पुढे बोलताना म्हणाले, भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत येणं म्हणजे भारतातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे. आम्ही विकसित भारताच्या संकल्पसाठी दीड वर्ष काम करतोय. सरकारी व्यवस्था लावली आहे. १५ लाख लोकांनी आपल्या कल्पना सांगितल्या आहेत. यामध्ये निम्म्याहून जास्त ३५ खालील युवकांचा समावेश आहे. देशाची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्स व्हायला साठ वर्षे लागली. आम्ही दहा वर्षात २ ट्रिलियन डॉलर्स वाढवले अर्थव्यवस्था 11 व्या नंबर वर होती. आम्ही अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर आणली, असेही पीएम मोदींनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Narendra Modi : 'भाजपला 370 पार यश मिळवावेच लागेल', लोकसभा निवडणुकी संदर्भात पंतप्रधान मोदींचा नारा, काय म्हणाले?