एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार. भाजपचा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा नेता दिल्लीला जाणार. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता.

मुंबई: महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून कायमचे दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते. जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद (BJP National President) रिक्त आहे. या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करुन भाजप पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेची मोट पुन्हा नव्याने बांधायची असल्याचे फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. त्यासाठी मला राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, अशी विनंती फडणवीसांनी केली होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना आता थेट दिल्लीतच बोलावून घेण्याची योजना आखल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून उत्तमपणे जबाबदारी पार पाडली आहे. संघटन कौशल्य, निवडणुकीची रणनीती आखण्याचा भाग असो किंवा कोणत्याही राजकीय संकटातून पक्षाला सहीसलामत बाहेर काढण्याचा विषय असो, या सगळ्याबाबत सध्याच्या घडीला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करणारे मोजके नेते आहेत. फडणवीसांचा हाच आवाका आणि क्षमतांचा वापर राष्ट्रीय पातळीवर पक्षसंघटनेसाठी करुन घेता येईल, अशी भाजप नेतृत्त्वाची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला कधी बोलावले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात राहणार?

देवेंद्र फडणवीस यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची चर्चा सुरू असतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आणखी एका पर्यायाचाही विचार केला जात असल्याची माहिती आहे. फडणवीस यांना सुरुवातीला कार्यकारी अध्यक्ष करावे आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवावे आणि निवडणुकीनंतर पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष करावे या पर्यायावरदेखील पक्षाचे नेतृत्व विचार करत असल्याचे समजते. दुसरा पर्याय म्हणजे आता लगेच देवेंद्र  फडणवीस यांना हंगामी राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाऊ शकते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे याबाबत पक्षाकडून काय अंतिम निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा

महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

महत्त्वाच्या बातम्या

महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
दारुचे भाव दहा पटीने वाढवा, साखरेचे भाव निम्म्यावर आणा, माजी मंत्र्याची अजब मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र
दारुचे भाव दहा पटीने वाढवा, साखरेचे भाव निम्म्यावर आणा, माजी मंत्र्याची अजब मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget