एक्स्प्लोर

पाथरी मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, आता बाबाजानी दुर्राणी काय करणार?

नांदेडच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी जाहीर केलीय. तर इतर जागा सोडवण्याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असे वरपूडकर म्हणालेत.

Parbhani: राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षानं आपापल्या मतदारसंघात संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यात सध्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठका सुरु असून परभणीतील 4 ही जागांवर काँग्रेसकडून इच्छूक उमेदवारांची यादी मागवण्यात आली आहे. पाथरीत काँग्रेसकडून सुरेश वरपूडकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. 2019 मध्ये पाथरीची जागा काँग्रेसने जिंकली. त्यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला असून राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबजानी दुर्राणी यांनीही पाथरीतून विधानसभेची उमेदवारी मागत तयारी सुरु केल्याने नांदेडच्या पाथरी मतदारसंघात बाबाजानी दुर्राणी की वरपूडकर असा पेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर निर्माण झालाय.  

नांदेडच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी जाहीर केलीय. तर इतर जागा सोडवण्याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असे वरपूडकर म्हणालेत.

पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानंतर पाथरीतून उमेदवारीसाठी हलचाली

अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश घेतला. तब्बल चार दशकांपासून बाबाजानी हे शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत होते. पवारांचे जूने समर्थक मानले जाणारे दुर्राणी राष्ट्रवादीया स्थापनेनंतर परभणीचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. पाथरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००४ ते २००९ या काळात प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर विधानपरिषदेवर ते दोनवेळा आमदार होते.

पाथरीच्या ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची मोठी फळी असून स्थानिक विरोधक असलेले सईद खान शिवसेना एकनाथ शिंदे गटात असल्याने त्यांच्याकडून बाबाजानींनी कोंडी झाली होती. त्यामुळे अजित पवारांच्या गटात त्यांनी प्रवेश केला. आता ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले असून पाथरी विधानसभेसाठी उमेदवारीसाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे.

दोनवेळा पाथरीचे उमेदवार असणारे वरपूडकर काँग्रेसकडून उमेदवार

मराठवाड्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यात परभणीतील सुरेश वरपूडकर यांनी पक्षाशी निष्ठा ठेवत कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला.  काँग्रेस पक्षातून राजकीय करिअरची सुरुवात केलेल्या वरपूडकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत असताना परभणी जिल्ह्यात त्यांचा शब्द अंतिम असायचा, असे सांगितले जाते. अंतर्गत गटबाजीचे कारण देत त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पाथरी विधानसभेची त्यांना उमेदवारीही मिळाली. मात्र, त्यांचा त्यात पराभव झाला होता. २०१९ मध्ये काँग्रेसने दुसऱ्यांदा संधी दिल्यानंतर त्यांना या मतदारसंघात अखेर विजय मिळाला होता. आता तेही पाथरी मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवार असताना पाथरीच्या जागेवर कोणाचा वरचष्मा राहणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थितRajkiya Shole on Saif Ali khan | हायटेक सुरक्षा असतानाही हल्लेखोर सैफच्या घरात शिरलाच कसा?Zero Hour on Nashik | महापालिकेचे महामुद्दे: नाशिक शहराचे उद्यानं धुळ खात पडलीतZero Hour on Dhule| धुळे पालिकेच्या कामाचा क्रमच उलटा, आधी रस्ते केले मग पुन्हा गटारांसाठी  खोदले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget