Pandharpur News : युवासेनेने (Yuva Sena) सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. युवासेनेने आज "संत्रा आमदार मुर्दाबाद, शहाजीबापू मुर्दाबाद" अशा घोषणा देत माळशिरस तालुक्यातील संगम इथे रास्ता रोको आंदोलन केलं. शहाजीबापूंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना सांगोल्यात भाड्याचे बंगले देतो असं विधान केल्याचा आरोप आहे. त्याविरोधात युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला. 

Continues below advertisement


युवासेनेने बॅनरबाजी करुन आमदार शहाजी बापू पाटील यांचा बिन अकलेचे गाढव असा उल्लेख केला. सोलापूर जिल्ह्यात विकासाचे तीन तेरा वाजले आहेत. मात्र आमदार शहाजीबापू राज्यभर कोरडी डायलॉगबाजी करत सुटले आहेत, असा हल्लाबोल युवासेनेचे गणेश इंगळे यांच्या नेतृत्त्वात आंदोलकांनी केला. युवासेनेने अकलूज-टेंभूर्णी रस्त्यावरील संगम इथे वाहतूक रोखली. 


युवासेना आक्रमक
बापू तुमच्यासाठी नोकरी आहे. मातोश्री बंगल्यात या कामाला, आम्ही सर्व शिवसैनिक तुमची शिफारस करतो उद्धव साहेबांना, असा टोला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी लगावला.


वहिनींना लुगडं पाठवू
वाचाळवीर असणारे शहाजीबापू स्वत:च्या बायकोला लुगडे नाही ओरडतात आणि ते आता उद्धव आणि आदित्य ठाकरेंना बंगले भाड्याने देतो म्हणतात. बापू स्वत: बेरोजगार झाले आहेत. तरीही बापू आम्ही सर्व शिवसैनिक मिळून उद्धवसाहेबांकडे तुमची शिफारस करतो. तुम्हाला उद्धवसाहेब नक्कीच मातोश्री बंगल्यात कामाला ठेवतील, तेव्हा तुम्ही लुगडं घ्या आमच्या वहिनींना. नाहीतर युवासेनेच्यावतीने तुमच्या बायकोला साडी चोळीचा आहेर पाठवला जाईल अशा शब्दात युवासेनेने टीका केली. 


संत्रा आमदार, जॉनी लिव्हर
यावेळी युवासेनेने शहाजीबापूंचा उल्लेख संत्रा आमदार (संत्रा दारु) ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर असा केला. "बापू मतदारसंघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा, काय दारू काय चकणा काय ते 50 खोके समदं कसं ओके, मी दारुडा अशा घोषणा युवासेनेच्यावतीने देण्यात देण्यात आल्या.


दरम्यान याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शहाजीबापूंना शिंदे गटाचे 'जॉनी लिव्हर' म्हटलं होतं. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अमोल मिटकरी यांचा संजय राऊत होणार, असं वक्तव्य केलं होतं. यावर अमोल मिटकरींनी त्यांच्या शैलीत उत्तर देत शहाजी पाटलांवर पलटवार केला. ते शिंदे गटाचे 'जॉनी लिव्हर' आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी शहाजीबापूंवर केली. ते काल (31 ऑगस्ट) अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होते.


संबंधित बातम्या