सोलापूर : आपल्याला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल आज सोलापूर लोकसभेच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)  या पंढरपूरकरांचे (Pandharpur News)  आभार मानण्यासाठी आल्या असता केवळ बॅनरवर फोटो नसल्याने नाराजीनाट्य समोर आले. यावेळी खासदार शिंदे यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने काँग्रेसमधील गटबाजी देखील समोर आली. त्या बॅनरवर दिवंगत आमदार भारत भालके यांचा फोटो नसेल तर तातडीने लावा अन्यथा मी कार्यक्रमाला हॉलमध्ये  येणार नसल्याचे सांगितल्यावर त्याच बॅनर वर कोपऱ्यात भालके यांचा फोटो चिटकविण्यात आला आणि मग कार्यक्रम सुरळीत पार पडला.


काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात आयोजित केलेल्या पहिल्याच कृतज्ञता मिळाव्यात ही अंतर्गत गटबाजी समोर आल्याने चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले. राज्यात ज्या प्रमाणे यावेळी मोदी सरकारच्या विरोधात लाट निर्माण होऊन जनतेने निवडणूक हातात घेतली होती.तीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात देखील यावेळी महाविकास आघाडीला मिळालेली मते हि जनतेच्या असंतोषाची होती. मात्र आता विजय झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाल्यानेच आजचे नाराजीनाट्य समोर आले. आज खासदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे पंढरपूर येथे या कृतज्ञता मेळाव्यासाठी आल्यावर भगीरथ भालके यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरवर भालके यांचा फोटो नसल्याने जोरदार घोषणाबाजी सुरु केली.


बॅनरवर भालके यांचा फोटो चिटकवल्यावर कार्यक्रम सुरळीत पार पडला


खरेतर या कार्यक्रमाच्या बॅनरवर केवळ राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र प्रणिती शिंदे कार्यक्रमस्थळी पोहचताच भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केल्याने प्रणिती शिंदे या कार्यकर्त्यांच्या जवळ पोहचल्या. त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी आयोजकांना तातडीने एकतर या बॅनरवर भालके यांचा फोटो लावा अन्यथा तो पूर्ण बॅनर मागून काढून टाका असा आदेश दिला. जर यातील काही न झाल्यास आपण कार्यक्रमाला येणार नसल्याचे सांगितले. यावेळी भगीरथ भालके हे देखील या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.  यानंतर त्याच बॅनरवर भालके यांचा फोटो चिटकवल्यावर कार्यक्रम सुरळीत पार पडला.


प्रणिती शिंदे निवडून येण्यात पंढरपूरकरांचा मोठा वाटा


सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे निवडून येण्यात  पंढरपूरकरांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने पंढरपूर शहरात आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र या बॅनरवर आमदार  भारत भालके व त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे छायाचित्र छापण्यात आले नव्हते त्यामुळे भालके समर्थकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना थेट जाब विचारत  घोषणाबाजी करत गोंधळ घातला.


हे ही वाचा :


Praniti Shinde : सोलापुरात झळकले जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडचे बॅनर, प्रणिती शिंदेंसाठी जनतेचे मानले आभार