Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलाय. दरम्यान याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री, म्हणून घरात उमेदवारी दिली", असा टोला रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 


शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी विकास केला


रोहित पवार म्हणाले, शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी विकास केला. युगेंद्रबाबत कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे, अंतिम निर्णय साहेब घेतील. कुठलं पद कुणाला द्यायचे हे साहेब ठरवतील. जयंत पाटील सिनियर आहेत, त्यामुळे चांगले काम करू शकतात. आज मुख्यमंत्री कोण होणार हे सांगू शकत नाही. एखादी महिला होऊ शकते. ज्यांची लायकी आहे त्यांच्याबाबत मला विचारा, ज्यांची लायकी नाही त्यांच्या बाबत मला विचारू नका, असा टोलाही रोहित पवारांनी उमेश पाटील यांना लगावला. 


भाजप 200 जागा विधानसभाला लढणार आहे, त्यामुळे महायुती राहणार नाही


पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, अमोल मिटकरी यांची लायकी काय आहे हे आपल्याला माहित आहे. पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही हे साहेब ठरवतील. आम्ही फक्त विनंती करू शकतो. परत घेताना कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. कर्जमाफी, आरक्षणाबाबत, भ्रष्टाचाराबाबत आम्ही अधिवेशनात आवाज उठवू.  सुनेत्रा पवारांना तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. भाजप 200 जागा विधानसभाला लढणार आहे. त्यामुळे महायुती राहणार नाही. सुनेत्रा पवार यांना राज्यसभा मिळाल्यानंतर पार्थ, दादा, जय आणि वहिनी सेलिब्रेशन करतील, असंही रोहित पवार म्हणाले.  माझ्या काकी म्हणून त्यांचे अभिनंदन करतो त्या खासदार झाल्या आहे. अजित पवारांनी भाषण केले मला नौटंकी म्हणतात. त्यांच्याच पक्षतील लोक आम्हाला फोन करतात आणि सांगतात. त्यांचे 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या पक्षातील लोक अस्वस्थ आहेत. त्यांचे सोबत  असलेले आमदार ब्रम्हदेव आला तरी त्यांच्यासोबत राहणार नाहीत. म्हणून त्यांनी सुनेत्रा काकींना उमेदवारी दिली, असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. 



इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांची स्वबळावर विधानसभा लढवण्याची तयारी; महाविकास आघाडीची साथ सोडणार?