Shikhar Pahariya on Praniti Shinde : मागील अनेक दिवसांपासून बोनी कपूर आणि दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा नातू शिखर पहारिया (Shikhar Pahariya) यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच बोनी कपूर यांनी देखील एका मुलाखतीमध्ये त्यांच्या नात्यावर भाष्य करत यावर शिक्कामोर्तबच केलं. त्यामुळे काही महिन्यांपासून शिखर पहाडिया हे नाव बरंच चर्चेत आहे. 


पण सध्या हे नवा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलंय. 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 30 उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळलला. सोलापुरात देखील काँग्रेसच्या उमेदवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची लेक प्रणिती शिंदे यांनी सोलापूरकरांची मनं जिंकत गड राखला. त्यांनी भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव केला. त्यावर त्यांचा भाचा आणि जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाने खास बॅनर देखील लावलेत. 


शिखर पहारियाची पोस्ट नेमकी काय?


शिखरने त्याच्या सोशल मीडियावर प्रणितीसाठी पोस्ट केली आहे. तसेच त्याने यावेळी सोलापूरच्या जनतेचे देखील आभार मानले आहेत. त्याने प्रणिती शिंदे यांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. शिखरने प्रणिती शिंदेंच्या अभिनंदनासाठी एका बॅनर देखील त्याच्या सोशल मीडियावर टाकलाय. त्यामुळे मावशीच्या विजयाचा भाच्यालाही खूप आनंद झाल्याचं चित्र आहे.





सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयी गुलाल उधळला आहे.  प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला.  एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोलापूर मतदारसंघात (Solapur Lok Sabha constituency)  2 टर्मपासून भाजपनं बाजी मारली होती. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने सोलापुरात विजय मिळवला होता. सुशील कुमार शिंदे यांना पराभव झाला होता.  2024 निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत भाजपला रोखलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जाती (SC) साठी राखीव आहे.  


लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोलापुरात तिरंगी लढत होती. काँग्रेस, भाजपसह वचिंतनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. 2019 मध्ये वचिंत आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, पण त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. यंदा मात्र प्रकास आंबेडकर यांनी वचिंतकडून राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले होतं. मात्र, गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसमध्येच प्रवेश केला. त्यामुळे वचिंतने अपक्ष उमेदवार अतिष बनसोड यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांची जादू म्हणावी तितकी चालली नसल्याचे दिसले.  


ही बातमी वाचा : 


'प्रिय मित्र नरेंद्र मोदीजी...', लोकसभेच्या निकालानंतर रजनीकांत यांची खास पोस्ट; एमके स्टॅलिन,चंद्राबाबू नायडूंचेही केलं अभिनंदन