मुंबईविधानपरिषदेचे (Vidhan Parishad)  विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.  अंबादास दानवेंच्या निलंबनात दोन  दिवसांची कपात करण्यात आली आहे.  उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून अंबादास दानवे सभागृहात येणार आहे.  दानवेंच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली. त्यानंत हा  निर्णय घेण्यात आला आहे.अंबादास  दानवेंनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती.  


अंबादास दानवेंच्या निलंबनांच्या कारवाईसंदर्भात भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला. अंबादास दानवेंच्या  निलंबन कालावधीत कपात करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.  


विधानपरिषदेत काय झाले?


चंद्रकांत पाटील : निलंबन कालावधी तीन दिवस करावं


नीलम गोऱ्हे : दानवे यांनी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा निलंबन कालावधी तीन दिवस करत आहोत. उद्यापासून अंबादास दानवे सभागृहात असतील.


निलंबन कारावाई मागे घेतल्यानंतर अंबादास दानवे काय म्हणाले?


निलंबन कारावाई मागे घेतल्यानंतर अंबादास दानवे म्हणाले,   मला असं वाटतं की, निलंबन मागे घेण्यात आले. त्याला उशीर त्यांनी केला आहे.  हा निलंबनाचा निर्णय मागे घेऊन खूप काही असं वेगळं त्यांनी केलं असं नाही .  मी दिलगिरी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवं होतं.  तरी त्यांनी तीन दिवस यामध्ये घेतले .उद्यापासून मी सभागृहात जाईल, तसेही  आता चार ते पाच दिवस   उरले आहेत.  मला जरी तीन दिवस सभागृहात येऊ दिलं नाही तरी मी माझा जनता दरबार सुरू ठेवला. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने  विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार आहे. 


विधानपरिषदेत काय झाले होते?


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक वारंवार आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये मोठा गदारोळ झाला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका व शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली होती. 


हे ही वाचा :


मुनगंटीवारांनी बहीण-भावाच्या नात्यावर अपशब्द वापरले, पण अंबादास दानवेंवर कारवाई; उद्धव ठाकरेंचा सवाल, महाराष्ट्राची माफीही मागितली