मुंबई (ठाणे) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सतत दौरे करत असून, त्यांच्या अनेक सभा देखील होत आहे. दरम्यान, पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड सुरु असून त्यासाठी आता ते घराबाहेर पडत असल्याची त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, त्यांच्यावर होणाऱ्या याच टीकेवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, उद्धव ठाकरेंची पाठराखण देखील केली आहे. 


याबाबत बोलतांना शर्मिला ठाकरे म्हणाल्यात की, "पक्ष वाचवण्यासाठी असे न म्हणता प्रत्येक राजकीय पक्षाला फिरावे लागते. फक्त उद्धव ठाकरे फिरत नाही. सत्तेत असणारे देखील फिरत आहे. सत्तेत नसतांना त्यांना देखील फिरावे लागते. लोकांशी संपर्क ठेवावे लागते. ते काय पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्यासाठी फिरावे लागते, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्यात. ठाण्यात मनसेच्या वतीने महिलासाठी हळदी कुंकू निमित्त बचत गट आणि सन्मान सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हा कार्यक्रम शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. याचवेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. 


महाराष्ट्र पोलिसांना फक्त 48 तास द्या...


राज्यात मागील काही दिवसांपासून सतत हिंसाचार, गोळीबार, प्राणघातक हल्ले अशा घटना घडत आहेत. यावर बोलतांना शर्मिला ठाकरे म्हणाल्यात की, "महाराष्ट्र राज्यातील पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर कोणतेही राजकीय दबाव न आणता फक्त 48 तास दिले तर महाराष्ट्रातील सर्व मारामाऱ्या बंद होतील, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्यात. 


उद्धव ठाकरेंचे एकामागून एक दौरे...


आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशात काही दिवसांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे पुलाखालून बरेच पाणी गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी उद्धव ठाकरे आता राज्यभरातील वेगवेगळ्या भागाचा दौर करत आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी कोकणाचा दौरा केला होता. तसेच, आज ते मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. विशेष म्हणजे आपल्या याच दौऱ्यातून उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांच्याकडून 11 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब देखील झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे उभं करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरल्याचे दिसत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर; एकाच दिवशी चार 'सभा'