धाराशिव : आपल्या विरोधी उमेदवाराने जर पैसे दिले तर आवर्जून घ्या, जास्तीचे घ्या, इतरांनाही द्या असं वक्तव्य महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका प्रचार सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सभेत उपस्थित मतदारांना विरोधी उमेदवार अर्चना पाटील आणि महायुतीकडून दिले जाणारे पैसे आवर्जून घ्या असा वादग्रस्त सल्ला दिला. ओमराजे निंबाळकरांनी केलेल्या या वक्तव्यावर आता निवडणूक आयोग काय कारवाई करतो हे पाहावं लागेल. 


पैसे दिले तर दुप्पट मागून घ्या


ओमराजे निंबाळकर म्हणाले की, माझ्या विरोधातील उमेदवाराने जर पैसे दिले तर आवर्जून घ्या, उलट भांडण करून जास्तीचे पैसे घ्या. एवढ्यावर भागत नाही असे सांगून दुप्पट पैसे मागा. आमच्याशिवाय आणखी लोकांना द्यावे लागते असे सांगून आणखी पैसे घ्या. मुळात त्यांनी बेईमानीने कमावलेला पैसा त्यांनी तुम्हाला वाटला तर त्या पैशासोबत बेईमानी करणे ही सर्वात मोठी इमानदारी आहे. कारण त्यांच्याकडचे पैसे तुमच्याकडून लुटलेले असून ते तुमचेच आहेत.


आता तुमची मज्जाज मज्जा


ओमराजे निंबाळकर म्हणाले की, मी खोके घेतले नाही म्हणून माझ्याकडे पैसा नाही. मात्र विरोधी उमेदवाराकडे फक्त पैसा आहे. सध्या बचत गटातील महिलांना पैसे देण्याचा कार्यक्रम सुरू असून विरोधी उमेदवाराकडून 50 ते 60 कोटी रुपये वाटले जाणार आहेत. मात्र त्यांच्याकडचे पैसे तुमच्याकडून आणलेले आहेत, म्हणजेच ते तुमचेच आहे. आता तुमची मज्जाच मजा आहे, चंगळ आहे असेही ओमराजे म्हणाले.


धाराशिव लोकसभेसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीकडून अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजितसिंहांचा पराभव केला होता. आता राणा जगजितसिंह हे भाजपचे आमदार असून त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडणुकीसाठी उभ्या आहेत. 


ओमराजे निंबाळकरांची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका


ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. भाजपच्या दबावामुळेच हे दोन्ही नेते महायुतीमध्ये सामील झाल्याचा आरोप त्यांनी केला. 


ही बातमी वाचा: