Odisha Cm Naveen Patnaik: ओडिशात मोठे राजकीय फेरफार होताना दिसत आहे. यातच आता ओडिशाच्या मंत्रिमंडळातील (Odisha Cabinet Resigned) सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवे मंत्री रविवारी राजभवनात शपथ (Oath) घेऊ शकतात. ब्रजराजनगर पोटनिवडणुकीत बिजू जनता दलाचा (बीजेडी) झालेला मोठा विजय आणि नवीन पटनायक सरकारच्या पाचव्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल होऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरबदलावेळी पक्षनेतृत्वाकडून पक्षातील नेत्यांच्या कामाचा विचार केला जाऊ शकतो. हे नेत्यांना माहित असल्याने तेही आपली मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करत आहेत. वादात अडकलेल्या आणि राज्य सरकारची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांना पक्षातून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्ष बीजेडी 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन मोठ्या गोष्टी करणार आहे. एक म्हणजे मंत्रिमंडळात फेरबदल आणि दुसरे म्हणजे पक्ष संघटनेची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना.
2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवीन मंत्री निवडले जातील
नवीन मंत्रिमंडळ तरुण आणि अनुभवी नेत्यांना एकत्रित करून बनवले जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन काही मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यांना प्रमुख संघटनात्मक कार्यभार सोपवले जाऊ शकते. 2024 च्या निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या टीमसाठी नवीन चेहरे निवडले जातील, कारण काही जिल्ह्यांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. नवीन कॅबिनेट मंत्री रविवारी राजभवनात शपथ घेऊ शकतात. प्रदिप आमट आणि लतिका प्रधान यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Electoral Bonds : भाजपच्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये प्रचंड घसरण, इलेक्शन फंडही 3623 कोटींवरून 752 कोटींवर
Kanpur Violence : कानपूर हिंसाचार प्रकरण, 18 जण अटकेत, योगींच्या कार्यकाळात आतापर्यंत किती हिंसाचाराच्या घटना घडल्या?
'तुम्ही माझ्यावर अन्याय केला...', राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?