Yavatmal–Washim Lok Sabha : मतदान न करता मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना ठाकरे गटाने उघड केला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील (Yavatmal–Washim Lok Sabha) यवतमाळच्या छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची (BJP) काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होती. तसेच त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला निवडणूक आयोग (Election Commission) ज्या शाहीचा वापर करतात, ती शाई लावून त्यांना पैशांचे वाटप केल्या जात असल्याचा खळबळजनक आरोपही यवतमाळच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजेंद्र गायकवाड यांनी केलाय. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह घटनास्थळी धाव घेत हा प्रकार उघड केलाय. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर जप्त
विशिष्ट सामाजातील हे मतदार असून त्यांना मतदान न करता त्या एवजी पैसे देण्यात येत होते. तसेच त्यांचे नाव एका वहीत नोंदवून त्यांच्या हाताला शाही लावण्यात येत असल्याची बाब यात उघडा झाली आहे. याबाबत यवतमाळच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजेंद्र गायकवाड यांनी तात्काळ तक्रार केल्यानंतर निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता काही अज्ञात व्यक्ती त्याठिकाणाहून पळून गेलेत.
तर ही व्यक्ति दुसरे तिसरे कुणीही नसून भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. या कारवाईत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाच्या हाती बोटाला लावल्या जात असलेली शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर लागले आहे. तर याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू असून आधिक तपास सध्या केला जात आहे.
मतदानाची शाई दाखवा अन् उष्माघात प्रतिबंधक औषधे मोफत मिळवा
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान हा लोकशाहीने दिलेला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा हा संदेश देत, अकोल्यातील होमिओपॅथी तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि उष्माघात प्रतिबंधक सनकुल होमिओपॅथी औषधी मोफत मिळवा, असा मतदान जनजागृती उपक्रम हाती घेतलाय. या माध्यमातून प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि चव्हाण होमिओपॅथी क्लिनिक मधून पुढील चार दिवस मतदानाची बोटावरील शाई दाखवून उष्माघात प्रतिबंधक औषधी मोफत मिळवावी, असे आवाहन डॉ. संदिप चव्हाण यांनी केले आहे. डॉ. चव्हाण हे कायम आपल्या नवनविन उपक्रमांकरिता प्रचलित आहे. अशातच प्रत्येक मतदाराने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, यासाठी त्यांनी या अनोख्या पद्धतीने मतदारांना साद घातली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या