Nitesh Rane, Ratnagiri Sindhudurg : "संजय राऊत यांना निवडणूक आयोग भाजपचा एक्स्टडेड हात आहे असं वाटतं. मात्र 2014 आणि 2019 ला हे आठवलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आताच ध्यानाला बसले नाहीत. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आताच वाटत की ते आचारसंहितेचा भंग करत आहेत. त्यावेळी आमच्या सोबत सत्तेत असताना ते आठवलं नाही", असे भाजप नेते नितेश राणे म्हणाले. ते रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


इंडिया आघाडीमध्ये येऊन नाक रगडाचे आणि मोदींवर टीका करायची


नितेश राणे म्हणाले,  लंडनमध्ये कोणासोबत एनडीएमध्ये येण्याबाबत बैठक झाली आणि बिनशर्त पाठिंबा देतो म्हणाले ते सीसीटीव्ही फुटेज समोर आणावं लागेल. इंडिया आघाडीमध्ये येऊन नाक रगडाचे आणि मोदींवर टीका करायची अशी यांची अवस्था आहे. सांगलीच्या जागेवरून उद्धव ठाकरे आघाडी मधून बाहेर पडणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी एनडीएमध्ये येण्याबाबत बैठक झाली की नाही हे शपथ घेऊन सांगावं, आव्हानही नितेश राणे यांनी दिलं. 


पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, अनिल परब यांनी ब्लॅकमेल करून उमेदवारी मिळवली. अनिल परब यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून वरुण सरदेसाई यांनी मातोश्रीवर तेव्हापासून आले नाहीत. तेव्हापासून का दिसत नाहीत? कुठे गायब झाले सरकारी भाचा? मातोश्रीमध्ये आणि उबाठामध्ये महाभारत सुरू आहे, लवकरच ते बाहेर पडेल, असंही राणे यांनी म्हटलंय. 


2014 आणि 2019 साली निवडणूक आयोगावर आक्षेप का घेतला नाही? 


उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 2014 आणि 2019 साली निवडणूक आयोगावर आक्षेप का घेतला नाही? आता आघाडीत जाऊन रडाराडी करत आहेत. संजय राऊत सामनाचे संपादकपद सोडून गृहमंत्र्यांकडे कामाला आहेत. निवडणुकीच्या काळात मोदींवर टीका केली, आता लंडनमध्ये बैठक घेऊन एनडीएमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मोदीशिवाय देशात कोणाचे नेतृत्व चालणार नाही. उद्धव ठाकरे नाक रगडत एनडीएमध्ये घेण्यासाठी आलेत. मात्र त्यांना घ्यायचं की नाही हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असंही नितेश राणे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांना घेऊन हिंदुत्वासाठी भाजपने घेतल तर आम्हाला मान्य आहे. देशहितासाठी हे आम्हाला मान्य आहे. भाजप 400 पार जागा घेणार, मोदी शिवाय देशात कुठलाही दुसरा पर्याय नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहनभुती मिळणार नाही तर भाजपला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शेण खाल्ल नसत तर राज्यात शिवसेना आणि भाजप युती राहिली असती, असा दावाही नितेश राणे यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी: उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश