मुंबई : शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली होती. आता यावरून भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चेहरा नक्कीच नाही, असे वक्तव्य केले होते. यावरून संजय राऊत यांनी  देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? त्यांना हे कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे. पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही, असे म्हटले होते. 


फडणवीस नावाचं रसायन तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल


संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर आता नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. नितेश राणे यांनी म्हटलंय की,  शरद पवारांच्या डोक्यात काय सुरु आहे हे समजून घेण्यासाठी म्हणे फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतील. फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे तुझ्यापेक्षा तुझ्या मालकाला चांगलं कळलं असेल. त्यांचा मेंदू कसा चालतो तुझा मालकाला विचार. फडणवीस हे सर्वांचे बाप आहेत, असे टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत केली आहे. 


तुझ्या मालकासारखं फक्त अंबानींच्या घरात जात नाहीत


तर संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरदेखील जोरदार टीका केली. ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी पळवले, राज्यातील अनेक संस्था गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) देखील गुजरातला पळवतील की काय, अशी शंका मला असल्याची संजय राऊत यांनी म्हटले. आता यावरूनही नितेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. अमित शहा दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईमध्ये येतात. तुझ्या मालकासारखं फक्त अंबानींच्या घरात जात नाहीत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्याला शहा साहेब बळ देतात.  पालिका निवडणूक व्हाव्या वाटत असतील तर तुमच्या लोकांनी कोर्टात केलेल्या पिटिशन मागे घ्या, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा


सोबत बाउन्सर अन् सहा गाड्या घेऊन फिरणारे काय हिंदूचे रक्षण करणार आहे? इम्तियाज जलील यांचा रितेश राणेंवर हल्लाबोल