Nitesh Rane : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट (Malhar Certificate) देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस (Meat) खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणेंच्या आवाहनामुळे नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्री नितेश राणे यांनी याबाबत 'एक्स'वर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस... आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम https://malharcertification.com या निमित्ताने सुरू झालेलं आहे.
मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये : नितेश राणे
मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व 100 टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असं आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हे निश्चित, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांच्या केलेल्या आवाहनानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या