Mumbai: मराठी कुटुंबाच्या दुकानावर बळजबरीने कब्जा करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या लालसिंह राजपुरोहित यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातून हकालपट्टी करण्याचा आदेश दिला असून कांदिवली पोलिसांनी त्यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे. (Lalsingh Purohit) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुंबईतील राजकीय गुंडगिरीवर टीका करत गरीब कुटुंबाला दुकान परत मिळवून द्या अशी मागणी केली होती .त्यानंतर आता या नेत्याचं थेट निलंबन करण्यात आले आहे .


नक्की प्रकरण काय?


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदिवलीच्या  प्रकरणावरून मुंबईतील शिंदे गटातील बड्या नेत्याला मोठा दणका दिलाय .लालसिंह राजपुरोहित यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचा आदेश एकनाथ शिंदेंनी दिलाय .त्यानंतर लालसिंह पुरोहित (Lalsingh Purohit) यांचं शिवसेनेतून निलंबन करण्यात आलंय .एका ज्येष्ठ दांपत्याची फसवणूक करत दुकान हडपल्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात लालसिंह राजपुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी रात्री उशीरा लालसिंह पुरोहित यांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर तातडीने पावलं उचलत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय .शिवसेनेचे मालाड कांदिवली आणि चारकोपचे विभागप्रमुख लाल सिंह पुरोहित यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे .या पदाधिकाऱ्याने केलेल्या चुकीच्या वर्तनासाठी त्याला जबाबदार धरून त्याला पक्षातून निलंबित केल्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंनीही पक्षाचे अधिकृत भूमिका मांडली आहे . लालसिंग राजपुरोहित विरोधात मराठी कुटुंबाचं घर हडप केल्याचा होता आरोप.


रविवारी रात्री अटक, पक्षातूनही हाकलपट्टी


पोलिसांनी 28 डिसेंबर रोजी राजपुरोहित आणि त्याच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच मुंबईतील मराठी कुटुंबाचे दुकान हडपल्याप्रकरणी शिंदेगटाच्या लालसिंह पुरोहितचा माज पोलिसांनी उतरवला असून शिवसेना अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पक्षातून निलंबन करत तात्काळ त्याला अटक करण्याची कारवाईही करण्यात आली. रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी पदाधिकारी लालसिंह राजपुरोहित यांना अटक केली. त्याच्यावर आणखी एका फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 



हेही वाचा:


मंत्रिपद जाताच धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय? एकापाठोपाठ एक विरोधकांचे व्हिडीओ बाहेर निघाले, धसांनंतर आता संदीप क्षीरसागर अडचणीत