Nitesh Rane : या सरकारमध्ये आपली कॉलर टाईट करा. पीर-बीर बाबांना विचारू नका. मोहम्मद पैगंबर यांना मानणारे मुस्लीमच पीर-बाबा वगेरे मोजत नाही.  मैं इस बाप का हू की उस बाप का यातच यांचा गोंधळ सुरू असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


अयोध्या येथील राम मंदिर उभारणीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित आळंदी आणि निगडी येथील कार्यक्रमांना बुधवारी (दि. 22) नितेश राणे यांनी हजेरी लावली. यावेळी भाषण करताना नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. नितेश राणे म्हणाले की, हिंदूंच्या धर्म स्थळावर वक्फ बोर्ड दावा करत आहे.  कुंभ मेळ्यातही वक्फ बोर्ड घुसखोरी करत आहे.  उद्या आळंदी येथे देखील वक्फ बोर्ड घुसखोरी करेल. सर्व धर्म समभावचा चारा ही नाटकं फक्त हिंदूसाठीच आहे, असे त्यांनी म्हटले. 


नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य


नितेश राणे पुढे म्हणाले की, सेक्युलर हा शब्द आपल्या संविधानात नाही.  सेक्युलर शब्द हा फक्त काँग्रेसची नाटकं आहेत. हे हिंदू राष्ट्र आहे, इथे फक्त आता हिंदूंचे हित पाहिले जाणार आहे. आगामी काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही. सरकार जे चालवत आहेत, त्यांचं रक्त लाल नाही, तर त्यांचं रक्त हे भगवं आहे. आम्ही या सरकारमध्ये नाही मिरवणार तर मग कुठे मिरवणार? या सरकारमध्ये आपली कॉलर टाईट करा. थडगे वगैरे जे काही बांधून ठेवले आहे, पीर-बाबा वगैरे यांना या राज्यामध्ये विचारू नका.  त्यांना बाहेर ढकलून टाका. मोहम्मद पैगंबर यांना मानणारेच मुस्लीम पीर बाबा वगेरे मानत नाहीत.  मैं इस बाप का हू की उस बाप का? यातच यांचा गोंधळ सुरू आहे, असे त्यांनी म्हटले. 






नितेश राणेंना बावनकुळेंच्या कानपिचक्या 


अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेला बांगलादेशी होता. सैफ व्यवस्थित चालत येत होता. त्यामुळे सैफवरील हल्ला संशयास्पद आहे. त्याने स्वत:च चाकू मारून घेतला की काय,’ अशी शंका देखील नितेश राणे यांनी व्यक्त केली. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितेश राणे खडेबोल सुनावले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, त्यांनी म्हटले आहे की चाकूचे वार आहेत, मोठे घाव आहेत तर एवढ्या लवकर कसे बरे झाले, असे वक्तव्य करण्याची गरज नाही. डॉक्टरांच्या उपचारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे आवश्यक नाही, असे त्यांनी म्हटले.   


आणखी वाचा 


Ajit Pawar: सैफवर खरंच हल्ला की अभिनय? नितेश राणेंच्या संशयावर अजित पवारांचं उत्तर, म्हणाले 'त्यांच्या मनात शंका असेल तर त्यांनी...'