Nilesh Rane vs Vinayak Raut Twitter War : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) मतदानाला केवळ एक दिवस शिल्लक असताना भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात ट्विटर वॉर (Twitter War) रंगलं आहे. विनायक राऊत एका ठेकेदाराला दमकावत असल्याचं कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केली आहे. 


विनायक राऊतांनी ठेकेदाराला धमकावल्याचा निलेश राणेंचा आरोप


दरम्यान, यानंतर आता विनायक राऊत यांनी उत्तर दिले आहे. निलेश राणे यांना आपल्या वडिलांचा पराभव दिसतोय, म्हणून त्यांनी अशा प्रकारची ऑडिओ क्लीप पोस्ट केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय कोकणातील जनता यांना जागा दाखवेल. निलेश राणे यांच्या भंपक आणि भोंदूगिरीचा माज कोकणातील जनता उतरवेल,  असं देखील प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिलं आहे. निलेश राणे यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट केल्यानंतर राऊत यांनीदेखील एक्स अकाउंटच्या माध्यमातून हे उत्तर दिलं आहे.


निलेश राणेंकडून ऑडिओ क्लीप व्हायरल


निलेश राणे यांनी एक्स मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात काहीच केले नाही, असं म्हणता येणार नाही. कारण त्यांनी नेमकं काय केलं याचा एक पुरावा आम्हाला सापडलाय. आता कोकणी जनतेने ठरवायचं आहे आपल्याला खासदार कसा पाहिजे.'


व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये काय म्हटलंय?


निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर आरोप करत व्हायरल केलेल्या कथिक ऑडिओ क्लीपमध्ये विनायक राऊत एका ठेकेदाराला धमकावत असल्याचं म्हटलं आहे. ही 19 मिनिटांच्या व्हिडीओ क्लीप निलेश राणेंनी पोस्ट केली आहे.


कथित ऑडीओ क्लीपमधील संभाषण


विनायक राऊत : ऐक विनायक बोलतोय, शाना झालास का जास्त. 


ठेकेदार : नाही साहेब 


विनायक राऊत : किती वेळा सांगितलं तुला भेटून जा? 


ठेकेदार : सॉरी, साहेब


विनायक राऊत : तुझ्या माणसाला सांग शेवटचे वीस दिवस आहे...


ठेकेदार : सांगतो, साहेब 


विनायक राऊत : टेंडर मलाच मिळणार... लक्षात ठेव काही करुन घेणार मी 


ठेकेदार : हो 


विनायक राऊत : त्यानंतर कसा पुढे जातो बघतो मी 


ठेकेदार : हो साहेब 


विनायक राऊत : उद्या साडे पाच वाजता ये. 


ठेकेदार : हो साहेब.






विनायक राऊतांचं चोख प्रत्युत्तर


निलेश राणेंच्या ट्वीटला चोख प्रतुत्तर देताना विनायक राऊतांनीही ट्वीट केलं आहे. 'चोराच्या उलट्या बोंबा. स्वतःच्या वडिलांचा पराभव 100 टक्के निश्चित झाल्याने वेडापिसा झालेल्या निलेश राणे या प्राण्याने मला बदनाम करण्याचे काही प्रयत्न केले. त्यापैकी 
1) लांजा येथील जलजीवनच्या तथाकथित भ्रष्टाचाराच्या नावाने केलेली बोंबाबोंब 
2)डी पोर्ट येथील कपोल कल्पित ठेकेदारीवरून केलेली कोल्हे कुई आणि आता 
3)कोण्या बोगस व्यक्तीच्या आवाजात माझ्या नावे केलेली "Fake Audio Clip"....
निलेश राणे यांच्या या भंपक भोंदूगिरीचा माज रत्नागिरी-सिंधुदुर्ग वासिय नक्कीच उतरवतील', असं ट्वीट विनायक राऊतांनी केलं आहे.






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Uddhav Thackeray : मोदींच्या सुरक्षेची गरज नाही, मला जनतेचं सुरक्षा कवच; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर डागली तोफ