Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : संसेदच्या नव्या इमारतीच्या (New Parliament Building) उद्घाटनावर ठाकरे गटानेही (Thackeray Group) बहिष्कार घातला आहे. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खोचक शब्दात टोला लगावला आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) कोण घेऊन जातंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन येत्या 28 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. परंतु उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते का होत नाही असा सवाल करत 19 विरोधी पक्षांनी उद्घाटनावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे. यामध्ये ठाकरे गटाचाही समावेश आहे. 


उद्धव ठाकरेंना लोकसभेत कोण बोलावतंय? : देवेंद्र फडणवीस


आमचा संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला विरोध असून मी संसद भवनात जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं माध्यम प्रतिनिधींनी म्हटलं. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "त्यांना कोण घेऊन जातंय, त्यांना जी जागा दिली होती, तिथेच ते जात नाहीत. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत, दोन तासांच्या वर तिथे बसत नाहीत, त्यांना कोण लोकसभेत बोलावतंय? आणि कोण त्यांना संसदेत भवनात बोलावणार आहे? या सगळ्या लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाही."


VIDEO Devendra Fadnavis: ठाकरेंना संसदेत नेतंय कोण? : देवेंद्र फडणवीस



नव्या संसदेच्या उद्घाटनावर 19 पक्षांचा बहिष्कार


देशातल्या 19 विरोधी पक्षांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार घातला आहे. काँग्रेससह महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचाही त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमातून बेदखल करणं हा लोकशाहीचा अपमान आहे अशी भूमिका घेत सर्वपक्षीयांनी एकत्रित निषेधपत्र जाहीर केलं आहे. 



  • ज्या हुकुमशाही पद्धतीनं नव्या संसदेची निर्मिती केली जातेय, याबद्दल आमचे काही आक्षेप असूनही ते बाजूला ठेवत या उद्घाटन कार्यक्रमाला राहायला आम्हाला आवडलं असतं.

  • पण या कार्यक्रमातून राष्ट्रपतींनाच बेदखल केलं जातंय, हा लोकशाहीचा अपमान आहे

  • घटनेनुसार राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहं मिळून संसद बनत असते. राष्ट्रपतींच्या सहीनेच संसदेचा कायदा मंजूर होत असतो

  • महिला आदिवासी राष्ट्रपती बनण्याची सर्वसमावेशक प्रकिया ज्या लोकशाहीनं घडवून आणली त्याचाही अनादर होतोय.


सरकारकडून उद्घाटनाची जोरदार तयारी


दुसरीकडे सरकार मात्र 28 मे च्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारीला लागलं आहे. दक्षिणेतल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा राजदंडही नव्या संसदेत स्थापित केला जाणार असल्याची माहिती अमित शाहांनी दिली आहे. सत्तेचं हस्तातंर करण्यासाठी हा राजदंड दिला जायचा. ब्रिटीशांच्या तावडीतून देश स्वतंत्र होत असतानाही हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरुंना दिला होता. नव्या संसदेत अध्यक्षांच्या खुर्चीजवळ हा राजदंड स्थापित केला जाणार आहे. 


संबंधित बातमी


New Parliament Building : संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर 19 पक्षांचा बहिष्कार तर सरकारकडून जोरदार तयारी