एक्स्प्लोर

NCP Vidhan Parishad : राष्ट्रवादीचा विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरला; माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना दिली संधी

NCP Vidhan Parishad : बाबा सिद्धकी यांच्यानंतर विधानसभेपूर्वी झिशान सिद्धकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेसाठी उमेदवारी माजी आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काँग्रेसमधून अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन येणारे बाबा सिद्दीकी पहिले नेते होते.  बाबा सिद्दीकी यांच्यानंतर विधानसभेपूर्वी झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. (NCPs candidate for Legislative Council decided)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची फोनवरून चर्चा झाली होती. काल पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक देखील पार पडली होती, त्याचबबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत चर्चा झाली होती अशी माहिती आहे. चर्चेत माजी आमदार झिशान सिध्दकी यांचं नाव आघाडीवर होते. 

Who is Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकी कोण आहेत?

झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याशिवाय झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 

झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून विजय मिळवून करून त्यांनी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी विधानसभेत प्रवेश केला होता; त्याकाळी ते राज्यातील सर्वात तरुण आमदार ठरले होते. विधिमंडळातील कामगिरीसोबतच त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती.

राजकीय प्रवासात मोठे वळण तेव्हा आले, जेव्हा १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना पुन्हा वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवले होते. या चुरशीच्या लढतीत त्यांना ४६,३४३ मते मिळाली, परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीतील या पराभवानंतरही पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. त्यांना आता विधान परिषदेवर पाठवण्यात येत आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget