एक्स्प्लोर

24 तास अजित पवारांसोबत म्हणणाऱ्या दीपक मानकरांना रुपाली चाकणकरांचे सडेतोड प्रत्युत्तर

राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होत्या. त्या नियुक्त्यांकडे सर्वच राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचं लक्ष लागलं होतं.

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच राज्यपाल नियुक्त आमदारांना संधी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याच्या महायुती सरकारने सूचवलेल्या नावांपैकी 7 नावांची निवड राज्यपालांच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी करण्यात आली. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आणि भाजपच्या तीन नेत्यांना संधी देण्यात आलीय. मात्र, या आमदारकीच्या निवडीनंतर राजकीय पक्षातील काही नेत्यांनी नाराजी उघड करत पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये, पुण्यातील (Pune) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak mankar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच, या राजीनाम्यानंतर त्यांनी थेट अजित पवारांना लक्ष्य करताना रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनाही टोला लगवला होता. आता, दीपक मानकर यांच्या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या कोट्यात तीन जागा असत्या तर मी आमदार झाले असते, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. 

राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होत्या. त्या नियुक्त्यांकडे सर्वच राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर काल मंगळवारी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी महायुतीतील पक्षांनी राज्यपालांकडे सात नावे पाठवली. त्या सात सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी सहमती दर्शविल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व सात सदस्यांना आमदारकी पदाची शपथ दिली. त्यामुळे आता इच्छुक नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. तसेच, आम्हाला का संधी मिळाली नाही, रुपाली चाकणकरांनाच सातत्याने संधी का मिळते, त्या कार्यकर्तीला तुम्ही ताकद देता, 24 तास तुमच्यासोबत असतात म्हणून त्यांचीच बाजू तुम्ही घेणार का, आम्हाला का नाही विचारणार, असे दीपक मानकर यांनी म्हटले होते. आता, दीपक मानकर यांच्या राजीनाम्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''मानकर यांना शहराध्यक्षपद देताना मी भगिनी म्हणून मानकर यांच्या पाठीशी उभी होते. पण, त्याने अस का केलं मला माहिती नाही,'' असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी दिलंय. रुपाली चाकणकर यांनी मानकर यांच्यावर अधिक बोलणे टाळले. 

पुढच्यावेळी माझा विचार केला जाईल

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यात जर तीन जागा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आल्या असत्या, तर महिला म्हणून मला आमदारकी मिळाली असती. परंतु, दोनच जागा आम्हाला मिळाल्या, पुढच्या वेळी माझा विचार केला जाईल, मला अपेक्षा होती आणि मी मागणी देखील केली होती, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी मनातील इच्छा उघड केली. तसेच, महायुती सरकारचे आभार मानते, मला परत एकदा महिला आयोगाचं अध्यक्ष पद देण्यात आलंय, असेही त्यांनी म्हटले. 

600 समर्थकांचा राजीनामा

राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नाराजी दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षांचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल झाली. यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर यांची वर्णी लागली नसल्याने मानकरांच्या समर्थकांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. सहाशे समर्थकांनी राजीनामे दिल्याचा दावा केला जातो आहे. 

हेही वाचा

राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  13 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde On BMC Election :काहीही करून पालिका जिंकायची, त्यामुळे शांंत बसू नका, शिंदेंचा निर्धारEknath Shinde On BMC Election  : प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार,एकनाथ शिंदेंचा बीएमसीसाठी निर्धारSpecial Report Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा,14 तारखेला मंत्रिमंडळ मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Embed widget