नवी दिल्ली :  निलेश लंके (Nilesh Lanke)  अहमदनगरमध्ये (Ahmednagar)  विजयाचा झेंडा रोवून, दिल्लीत पोहोचले. निलेश लंके त्यांच्या राहणीमानामुळे, वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात.  कोरोना काळात तर त्यांनी केलेल्या कामांमुळे देशभरात त्यांचा डंका वाजला.  शपथविधी दरम्यान निलेश लंके हे देशाच्या नाक्यानाक्यावर चर्चेचा विषय ठरले. लोकसभेत खासदारांच्या शपथविधीचा सोहळ्यात निलेश लंकेंनी  इंग्रजीत शपथ घेतली. आता निलेश लंकेचा सध्या एक फोटो  चांगला चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nilesh Lanke Meets Nitin Gadkari)  यांनी निलेश लंकेंच्या खांद्यावर हात  ठेवला आहे. 


कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंके समोर आले त्यांच्या कामाचे भरपूर कौतुक झाले.  निलेश लंके हे रस्त्यासाठी उषोपणाला बसले होते, त्यावेळी नितीन गडकरी यांनी स्वत: फोन केला होते. त्यावेळी निलेश लंकेंनी देखील मी जर कोणत्या  नेत्याचा आदर करत असेल किंवा मानत असेल तर ते नितीन गडकरी आहे, असे म्हटले होते.  त्यानंतर आज खासदार झाल्यानंतर निलेश लंकेंची आणि गडकरी यांची भेट बरच काही सांगून जात आहे.  


भेटीनंतर निलेश लंके काय म्हणाले?


आज अधिवेशनानंतर खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो स्वत: निलेश लंकेंनी ट्वीट केला आहे.  निलेश लंके म्हणाले, देशाच्या रस्ते उभारणीत ज्यांचे बहुमूल्य योगदान आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची आज संसद भवन परिसरात भेट झाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली, दिलखुलासपणे संवाद साधला. ज्यांच्याकडे पाहून समाजसेवेची एक वेगळी ऊर्जा मिळते. 


दिल्लीत लोकसभेचं पहिलं अधिवेशन


देशात नव्या सरकारची स्थापना झाली असून 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनातील पहिल्या दोन दिवसांमध्ये सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली. तर, आज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड झाली. त्यामुळे सध्या सर्व नवनिर्वाचीत खासदार हे दिल्लीत आहे.  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक ठरलेल्या अहमदनगर मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी  भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव केला. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विखे-पाटील घराण्याचे नाव मोठे असल्याने सुजय विखेंचा पराभव करुन निलेश लंके हे एका अर्थाने जायंट किलर ठरले.  






गजा मारणेंच्या भेटीचा व्हिडीओ झाला होता व्हायरल


काही दिवसांपूर्वी  पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि खासदार निलेश लंके यांची भेट झाली आणि राजकीय भूकंपच झाला.  कुख्यात गुंड गजा मारणे याची केवळ निलेश लंके यांच्यासोबत भेटत झाली त्यानंतर लंकेंचा गजा मारणे याने सत्कार देखील केला होता. सत्काराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.  निलेश लंके यांच्यावर टीकेची झोड उठली. लोकसभा निवडणूक गजा मारणे यांनी मदत केल्याने त्याच्या आभार मानण्यासाठी निलेश लंके तिथे गेले असावेत अशी टीका देखील विरोधकांनी केली होती.  


हे ही वाचा :


Video: I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ