सांगवी, बारामती : शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज बारामतीत आपल्या राजकारणातील जुन्या विरोधकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधलाय. बारामतीत काकडे विरुद्ध पवार असा संघर्ष सर्वांना ज्ञात आहे. त्या काकडे कुटुंबांना निंबूत या ठिकाणी जाऊन सांत्वन पर भेटीच्या निमित्ताने पवार यांनी संभाजी काकडेच्यां घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच थेट बारामती तालुक्यातील सांगवी या ठिकाणी गेले आसताना एकेकाळचे वर्गमित्र असणारे चंद्रराव तावरे (Chandrarao Tawre) यांची भेट घेतली.  गेली 25 वर्ष विरोधात काम करीत असलेले पवार यांचे दुसरे विरोधक भाजपाचे ज्येष्ठ नेते माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांची देखील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.


 माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यांचा शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात अनेक वर्ष संघर्ष सुरू आहे. यात कधी तावरेंकडे तर कधी पवार गटाकडे कारखान्याचे सूत्रे होती. आता अजित पवार यांच्या वर्चस्वाकडे माळेगाव कारखाना आहे. शरद पवार यांनी आज जेष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची देखील भेट घेतली. भेटीवेळी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते आणि बंद दाराआड साधारण 10 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. यावेळी चंद्रराव तावरे यांनी शरद पवार हे आमच्या घरी आले नाहीत तर शेजारी राहणाऱ्या काकडे कुटुंबियांकडे सात्वनपर भेटीला आले होते. त्यानंतर आमची भेट झाली. या भेटीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं चंद्रराव यांनी सांगितलं आहे. 


चंद्रराव तावरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. ते आणि शरद पवार हे 10 वी पर्यंत सोबत शिकले त्यानंतर शरद पवार यांनी शिक्षण सुरु ठेवलं मात्र तावरे हे शेतीत रमले. त्यानंतर त्यांनी सागवीत शेती केली. याचदकम्यान 21 व्या वर्षी तावरे हे सांगवीचे स रपंच झाले. नंतर पंचायत समितीचा सदस्य झाले.माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून माझी निवड झाली. सलग ३५ वर्षे या कारखान्यावर संचालक, चेअरमन, व्हाइस चेअरमन  होते.


त्यात आता भरपूर वर्षांनी शरद पवार यांनी चंद्ररावांची भेट घेतली. या भेटीत चर्चा झाली मात्र कोणतीही चर्चा झाली नाही, असं चंद्रराव यांनी सांगितलं. शरद पवार सध्या जुन्या सहकाऱ्यांना आणि विरोधकांच्या भेटी घेताना दिसत आहेत. त्यात ते बारामतीसाठी जुळवाजुळ कराताना दिसत आहेत.


इतर महत्वाची बातमी-


Sharad Pawar Meet Kakde family : 55 वर्षांनी राजकीय वर्तुळ पूर्ण? शरद पवार घेणार कट्टर प्रतिस्पर्धी काकडे कुटुंबीयांची भेट; कारण ठरलं...