बारामती, पुणे : शरद पवार (Sharad Pawar) आज त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे कै. संभाजीराव काकडे, कै.बाबालाल काकडे यांच्या कुटुंबियांना त आज भेट घेणार आहेत. तब्बल 55 वर्षांनी पवार काकडे कुटुंबाची भेट घेतली आहे. मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव काकडे यांच्या निवासस्थानी शरद पवारांनी भेट घेतली आहे. माजी खासदार कै. संभाजी काकडे यांची पत्नी कंठावती काकडे  यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर पवार हे त्यांच्या सांत्वन करण्यासाठी आले आहेत. पवार काकडे हा संघर्ष सर्वांना ज्ञात आहे. शरद पवार हे 55 वर्षात पहिल्यांदा काकडे यांच्या भेटीला गेले आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील पाच वर्षापासून काकडे कुटुंबीयांची जुळवून घेत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजीत काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली आहे. पवारांच्या विरोधात काकडे यांनी अनेक वेळा खासदारकी आणि आमदारकी लढवली होती. राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्यानंतर आता तब्बल 55 वर्षानंतर शरद पवार हे काकडे कुटुंब यांना भेटण्यासाठी आले असल्याचं सांगितलं जातं आहे.


पवार काकडे भेटीने 55 वर्षानंतर एक राजकीय वर्तुळ पूर्ण होत आहे. शरद पवारांचा राजकीय उदय झाला तोच मुळी काकडे यांच्या संघर्षातून. शरद पवारांचा राजकीय उदय होण्याच्या आधी बारामती परिसरात काकडे कुटुंबियांचं त्रस्त होतं. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना त्यासोबत बारामती तालुक्यातील संस्थानावर काकडे कुटुंबांचं वर्चस्व होतं. या वर्चस्वाला त्यावेळी नवख्या शरद पवारांनी शह दिला आणि राजकारणात आपली पाळंमुळं रोवली.


आता शरद पवार सात्वनपर भेटीला गेले आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यात बारामतीची सगळ्यात जास्त चर्चा रंगते आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत फुट पाडल्यानंतर बारामतीत नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. मात्र या काकडे कुटुंबातील सतीश काकडे हे अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे संभाजीराव काकडे आणि इतर काकडे कुटुंबातील सदस्य काय भूमिका घेणार?, शरद पवारांच्या बाजूने जाणार की अजित पवारांच्या बाजूने जाणार? यावरती बारामती तालुक्यातील मतदान मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Junnar Leopard Attack : साखर झोपेतच चिमुकलीला पळवलं; आई-वडिल संतापले; बिबट्यांचे हल्ले कधी थांबणार?


Vijay Shivtare : फाटली, पलटी मारली, अजित पवार मंचावर असताना विजय शिवतारे काय काय म्हणाले?