एक्स्प्लोर

नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनाही मंत्री महोदयांचा फोन

कथित व्हिडीओ प्रकरणात नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावं लागलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. एकीकडे राज्यात अशोक खरात (Ashok Kharat) व्हिडिओ आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरण गाजत असतानाच राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांचेही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे, मंत्री झिरवळ हे शासकीय निवासस्थानी दिसत असून हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावरही पक्षातून कारवाई होणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, राष्ट्रवादीने झिरवाळ यांना अभय दिलं आहे. 

नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभय देण्यात आलं असून कथित व्हिडीओ प्रकरणात नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. दरवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही, अशी पक्षातील वरिष्ठांची भूमिका आहे. त्यामुळे व्हिडीओ प्रकरणात नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्‍यांना आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडे हे मंत्री पदावर असताना संतोष देशमुख प्रकरणात त्यांच्या निकटवर्तीयास अटक करण्यात आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. तर, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे.

झिरवाळ यांच्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मला दूरध्वनीवरुन संपर्क केला, 3-4 व्हीडिओ जोडत चुकीच्या पद्धतीने समोर आणले आहेत. त्यामुळे, यासंदर्भात त्यांना सांगितलं आहे, तक्रार करा. व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळांना सांगितले. आम्ही आणि सुनेत्रा पवार त्यांच्यासंदर्भात कारवाई करू, मात्र सत्यता पडताळली जाईल. झिरवाळ यांचे व्हीडिओ गंभीर, सत्यता पडताळून पाहिली पाहिजे, असेही फडणवीसांनी म्हटले.  

खरात व्हिडिओ प्रकरणावरुन इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणावरूनही भूमिका स्पष्ट केली. पहिल्यांदा त्यांचे फोटो व्हिडिओ येतात, त्यावरुन गोष्टी डिटरमिन करता येणार नाही. सहभाग असेल तर कारवाई होईल, कोणालाच सोडण्याचे कारण नाही. येत्या काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे, आर्थिक फसवणूक झाली म्हणून लोकं पुढे येत आहेत. ह्या प्रकरणात दुर्दैवी महिला व्हीक्टिम आहेत, त्यांचे व्हीडिओ सोशल मीडिया साईटवर टाकले आहेत. जर कोणी व्हिडिओ अपलोड केले असतील तर कारवाई होईल. यातील गोपनीयता भंग करण्यात येत आहेत, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. 

हेही वाचा

मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Ganesh Naik on Eknath Shinde: बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?
बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget