अकोला: राज्यात महायुतीत शिंदे आणि अजित पवारांना (Ajit Pawar) भाजप एक अंकी जागा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला. राज्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला 10 ते 13 दरम्यान लोकसभेच्या जागा (Lok Sabha Election) मिळणार असल्याचा दावा आमदार मिटकरी यांनी केला. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होते.
निलेश लंके अजितदादांना सोडून जाणार नाहीत
नगर जिल्ह्यातील आमदार निलेश लंके हे अजित पवारांना सोडून कुठेही जाणार नसल्याचं आमदार मिटकरी म्हणाले. त्यांना अजितदादांनी अधिकाधिक विकास निधी दिला आहे, त्यामुळे ते नाराज नसल्याचं आमदार मिटकरी म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके शरद पवारांसोबत जाणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यावर अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं.
अमोल कोल्हे यांनी नथूराम गोडसेचीही भूमिका केली
अजित पवारांवर सातत्याने जहरी टीका करणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर आमदार मिटकरींनी जोरदार शरसंधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भमिका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेचीही भूमिकाही केल्याची आठवण आमदार अमोल मिटकरी यांनी करून दिली. पुढच्या काळात डॉ. अमोल कोल्हे यांची अजित पवारांवरील कोणतीही टीका सहन करणार नसल्याचा इशारा आमदार मिटकरींनी यावेळी दिला. .
अमोल मिटकरी काय म्हणाले?
- राज्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला 10 ते 13 दरम्यान लोकसभेच्या जागा मिळणार.
- राज्यात महायुतीत शिंदे आणि अजित पवारांना भाजप एक अंकी जागा देणार असल्याच्या चर्चामध्ये कोणतेही तथ्य नाही.
- आमदार निलेश लंके हे अजित पवारांना सोडून कुठेही जाणार नाहीत.
- त्यांना अजितदादांनी अधिकाधिक विकास निधी दिल्यामुळे ते नाराज नसतील.
- छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भमिका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेचीही भूमिकाही केली.
- पुढच्या काळात डॉ. अमोल कोल्हे यांची अजित पवारांवरील कोणतीही टीका सहन करणार नाही.
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात
राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची अंतिम टप्प्यात असून दोन दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये भाजपने 32 जागा लढवण्याची तयारी केल्याचीही चर्चा असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक अंकी जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही बातमी वाचा: