Sunil Shelke PC : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या इशाऱ्यानंतर अजित पवार गटाचे नेते सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी यावर उत्तर देत थेट शरद पवारांना आव्हान दिलं आहे. साहेबांनी या प्रकरणाची शाहनिशा करणं गरजेचं होतं, दमदाटीचा आरोप खोटा आहे, असं शेळकेंनी म्हटलं आहे. यासोबतच शेळकेंनी पवारांना आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याचं थेट आव्हान दिलं आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा विरोधकांवरही साहेबांनी व्यक्तिगत टीका केली नाही, पण  माझ्यावरचं नेमकी टीका का केली असा सवाल सुनील शेळके यांनी विचारला आहे. 


सुनील शेळकेंचे थेट शरद पवारांना आव्हान


पुण्याच्या लोणावळ्यातील कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षात प्रवेश करू नये. म्हणून दमबाजी करणाऱ्या आमदार सुनील शेळकेना शरद पवारांनी सज्जड दम दिलाय. पण आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी थेट शरद पवारांनाचं आव्हान दिलंय. मी कोणाला दमबाजी केले हे पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करावं. मी पवार साहेबांशी भेटून हे विचारणार आहे. 


'...नाहीतर शरद पवारांनी खोटे आरोप केल्याचं सांगणार'


शरद पवारांनी व्यक्तिगत टीका केल्याचं आश्चर्य वाटल्याचं सुनील शेळके यांनी सांगितलं आगे. मी दमदाटी केल्याचे आरोप खोटे आहेत. पुढील आठ दिवसात मी दम दिलेला एकतरी व्यक्ती समोर आणा, नाहीतर शरद पवारांनी खोटे आरोप केल्याचं राज्यात सांगणार असं शेळके यांनी म्हटलं आहे. सुनील शेळके यांनी मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्ते पवारांकडे येतात म्हणून त्यांना धमकी दिल्याचं सांगत पवारांनी शेळकेंना इशारा दिला होता. त्यानंतर शेळकेंनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.


पवार साहेबांना खोटी माहिती दिली


मावळ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची बैठक आणि मेळावा आयोजित केली होती. या बैठकीचं आणि मेळाव्याचं आयोजन केलं, त्यामध्ये मागच्या आठ दिवसांपूर्वी साहेबांना काही माहिती दिली त्यामध्ये मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते पवार साहेबांसोबत यायला तयार आहेत, आपण इकडे आलं पाहिजे. आपल्या हस्ते अनेक जणांना पक्षप्रवेश करायचा आहे, अशी खोटी माहिती देऊन पवार साहेबांना मावळमध्ये आमंत्रित केलं. 


कार्यक्रम सुरु होत असताना राष्ट्रवादीतील साधारण 35 ते 40 कार्यकर्ते, ठाकरे गटाचे आणि काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सर्व सभागृहात 150 ते 200 कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी साहेबांना चुकीची माहिती देत सांगितलं की, आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला जाऊ नका, अशी धमकी दिल्याचं सांगितलं. यानंतर पवार साहेबांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. 


पवार साहेबांच्या वक्तव्याचं आश्चर्य


शेळके यांनी पुढे म्हटलं की, पवार साहेब आमच्यासाठी श्रद्धास्थान होते आणि आहेत. पण, साहेबांनी याबाबतीत वक्तव्य करताना शाहनिशा करणं अपेक्षित होतं. मागील 55 वर्षांचा साहेबांची राजकीय वाटचाल पाहिली, तर साहेबांनी कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही. पण, माझ्याबाबतील साहेबांनी असं वक्तव्य का केलं, याचं मलाही आश्चर्य शेळकेंनी व्यक्त केलं आहे.


माझी काय चूक झाली ते सांगा


मी पवार साहेबांना भेटणार, माझी काय चूक झाली ते सांगा. पण, आपण जसं सांगितलं की, मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झाली हे मला आपण सांगावं. ज्यांनी मी दमदाटी दिल्याची माहिती दिली, ती माहिती खरी दिली की खोटी, हे आपण जाणून घ्यावं, अशी अपेक्षाही शेळके यांनी बोलून दाखवली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sharad Pawar : मला 'शरद पवार' म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही; पवारांचा सुनील शेळकेंना इशारा