Pune Politicle Updates: पुणे : पुणे (Pune News) शहरातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीची एक महिला पदाधिकारी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहे. पक्षात योग्य संधी मिळत नसल्यानं नाराज होऊन पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. संबंधित महिला पदाधिकारी पूर्वाश्रमीची मनसेची (MNS) नगरसेविका असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) पुण्यातील काही नावांची चर्चा सुरू आहे, अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर कोणत्या पक्षाची साथ देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा भोपळा फुटला पण त्यांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं. अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेकजण शरद पवारांच्या संपर्कात असून दादांची साथ सोडून थोरल्या पवारांकडे जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पुणे म्हटलं की, राष्ट्रवादी हे जवळपास समीकरणंच. याच पुण्यात आता दादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवारांची महिला पदाधिकारी पक्षाला रामराम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षात योग्य संधी मिळत नसल्यानं नाराज झालेली महिला पदाधिकारी पक्षाला रामराम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुले अनेक नावांची चर्चा सुरू आहे. अशातच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितदादांची साथ सोडण्याच्या तयारीत असलेली महिला पदाधिकारी पुर्वाश्रमीची मनसेची नगरसेविका असल्याच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. 


लोकसभेनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलणार? 


एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलून गेली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून सातत्यानं नवनवे दावे केले जात आहेत. महायुतीतही काहीसं नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गट मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत मागणी करण्याच्या तयारीत आहे. तर नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबतच्या बैठकीतही 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर संपूर्ण चित्र पालटल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला यंदाच्या लोकसभेत केवळ 17 जागांवर सामाधान मानावं लागलं, तर महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारत 32 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे लोकसभा निकालानंतर राजकारणातील समीकरणं काहीशी बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता नेमके कोणाचे आमदार, कुणाकडे जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.