Maharashtra Legislative Council Elections 2024: मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई (Mumbai News) पदवीधर, कोकण (Konkan News) विभाग पदवीधर, नाशिक (Nashik News) विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत आहे. एकूण 88 उमेदवार या निवडणुकीसाठी वैध ठरले होते. त्यापैकी 33 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानं आता 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या 



  • मुंबई पदवीधर मतदारसंघात 8 

  • कोकण विभाग पदवीधर 13 

  • नाशिक विभाग शिक्षक 21 

  • मुंबईतील शिक्षक मतदारसंघात 13


बुधवार 26 जून 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या चारही मतदारसंघाकरता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवार 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 5 जुलै 2024 रोजी पूर्ण होणार आहे.


भाजपच्या मनधरणीनंतर मनसेची विधान परिषद निवडणुकीतून माघार 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच भाजपकडून विधान परिषदेवर असलेले निरंजन डावखरेंचं काय होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसेनं जाहीर केलेला उमेदवार महायुतीचा की, मनसे स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे भाजपकडून राज ठाकरेंची मनधरणी केली जाणार का? अशाही चर्चा सुरू होत्या. अशातच आता भाजपनं विधान परिषदेसाठी यादी जाहीर केली. कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर निरंजन डावखरेंनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. भाजप पक्षश्रेष्ठींकडूनही राज ठाकरेंना विधान परिषदेची उमेदवारी मागे घेण्यासाठी गळ घालण्यात आली. त्यानंतर मनसेकडून अभिजीत पानसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. 


काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद जवळपास संपुष्टात


शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत मविआतील बिघाडी संपल्यात जमा आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्यानुसार, नाना पटोलेंनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आता भाजपचे शिवनाथ दराडे ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. तसंच, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी देखील माघार घेतली आहे. 


26 जूनला विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया 


केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत आहे. 26 जून 2024  रोजी मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.