Nawab Malik and Ajit Pawar NCP, मुंबई : राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आता अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा मुंबईत पोहोचणार आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या यात्रेमध्ये आणि राष्ट्रवादीच्या स्टेजवर माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित राहणार आहेत. काही महिन्यांपूर्वी नवाब मलिकच्या (Nawab Malik) यांच्या महायुतीतील प्रवेशावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा विरोध डावलून नवाब मलिक राष्ट्रवादीच्या स्टेजवर उपस्थित राहणार आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 


अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्या मुंबईत 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्या मुंबईत पोहोचणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार झिशान सिद्धकी यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघ आणि नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात रॅलीच आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली सभा मैदान क्रमांक 5 वांद्रे शासकीय वसाहत खेरवाडी येथे बाबा सिद्दीकी यांच्या नेतृत्वात पार पडणार आहे. तर दुसरी सभा अणुशक्तीनगर मतदारसंघातील चंदन लाँन्स देवनार चेंबूर येथे नवाब मलिक यांच्या नेतृत्वात पार पडणार आहे.  नवाब मलिक उद्या पहिल्यांदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर अधिकृत रित्या पाहायला मिळणार आहेत तर दुसरीकडे काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. सिद्दकी अजितदादांसोबत गेले तर काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसू शकतो. 


नवाब मलिक यांची जनसन्मान यात्रेबाबत फेसबुक पोस्ट


नवाब मलिक फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार महाराष्ट्र राज्यामध्ये चालू असलेली जन सन्मान यात्रा घेऊन आता आपल्या अणुशक्तिनगर तालुका येथे येत आहे. नागरिकांसोबत हितगुज करणे आणि 'माझी लाडकी बहीण योजने' बद्दल जनजागृती करणे हे या कार्यक्रमाचे मूळ ध्येय आहे. रक्षाबंधनाच्या दिनी सोमवारी, दि. 19 ऑगस्ट 2024 रोजी, सायंकाळी 4.00 वा. चंदन लॉन, सायन-ट्रॉम्बे रोड, देवनार आगाराजवळ, चेंबूर येथे येऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या या जन सन्मान यात्रेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी करतो.


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आरक्षणाचा मुद्दा, लाडकी बहीण जोमात, महाराष्ट्राची मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणाला पसंती? नवा सर्व्हे समोर!