Maharashtra Assembly Election 2024 : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील दोन राज्यांच्या विधानसभा निवडणूका जाहीर केल्या आहेत. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. हरियाणामध्ये 90 जागांसाठी 1 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 4 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही (Maharashtra Assembly Election) याच वर्षी दिवाळीनंतर होणार आहेत.  विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला निवडणुका झाल्या तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून लोकांची कोणाला पसंती असेल? कोणाची सत्ता येईल? याबाबत 'झी'ची एआय अँकर जीनिया हिचा सर्व्हे समोर आलाय. या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात कोणाची सरशी आहे? जाणून घेऊयात...


एआय अँकर झीनियाने केलेल्या सर्व्हेनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस सर्व्हेमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे, तर तिसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे सर्व्हेनुसार महाराष्ट्राचा कल महायुतीकडे  आहे. 


नव्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आघाडीवर 


राज्यात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता मिळवू शकतो का?असे विचारले असता 38 टक्के लोकांनी भारतीय जनता पक्षाला पसंती दिली आहे. तर 22 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठबळ दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला 17 टक्के लोकांनी पसंती दिली. केवळ 14 टक्के लोकांनी काँग्रेस पक्षाला पसंती दिली याशिवाय केवळ 9 टक्के लोक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आहेत. 


शिवसेना फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार का? 


शिवसेना फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंना मतदारांची सहानुभूती मिळेल का? असे विचारले असता, 35 टक्के लोक त्यांच्या बाजूने उभारले आहेत. 35 टक्के लोकांनी  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सहानुभूती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र 45 टक्के लोकांनी त्यांना कोणतीही सहानुभूती नाही, असं म्हटलं. तर 20 टक्के लोकांनी मत व्यक्त न करण्यास पसंती दिली आहे. 


महायुतीला विधानसभा निवडणुकीत दिलासा मिळण्याची शक्यता 


लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला सर्व्हेमध्ये दिलासा मिळाला आहे. शिंदे सरकारने लाडकी बहीन योजना आणि लाडका भाऊ योजना आणली. या योजनांचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीला फायदा होईल का, असे विचारले असता, 55 टक्के लोकांनी सरकारच्या बाजून मत व्यक्त केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Assembly Election 2024 : भाजपला 95 ते 105 जागा, उद्धव ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज; टाईम्स-MATRIZE सर्व्हेने कुणाकुणाची धाकधूक वाढणार?