छत्रपती संभाजीनगर : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा ओवेसींना चॅलेंज दिलं आहे. नवनीत राणा यांनी तेलंगणा राज्यात 15 सेकंदांबाबत केलेल्या वकत्व्यानंतर त्यांच्यावर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बोलताना नवनीत राणा यांनी भूमिका मांडली आहे.   हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झालाय अशा गुन्ह्याला मी मोजत नाही, असं राणा म्हणाल्या. मला एक गोष्ट समजते ज्या देशात आम्ही सव्वाशे कोटी लोक आहोत, तिथे 15- 20  कोटी असलेले लोक खुलेआम धमकी देतात, पोलीस हटवा. खुलेआम धमकी देणाऱ्यांना उत्तर द्यावे तर लागेल ते उत्तर मी दिलेले आहे. त्यांनी उत्तर मागितलं होतं, मी उत्तर दिलेलं आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. 


सव्वाशे कोटी लोकसंख्येत आम्ही घाबरुन बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही आमचे संस्कार, संस्कृती आमच्या पाठिशी आहे.  मोठे म्हणतात छोटे को दबा के रखा है तर आम्ही काय करतोय या हिंदूस्थानमध्ये, पाकिस्तान प्रेमी लोकं म्हणत असतील तर आम्ही काही बांगड्या घालून बसलेलो नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. 


पाहा व्हिडीओ :



गुन्ह्याला घाबरत नाही : नवनीत राणा


ओवेसी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी गुन्ह्याला घाबरत नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या.  आम्हाला खुलेआम धमकी दिली जात आहे.हैदराबाद मध्ये हिंदूला दाबून ठेवलं आहे, त्याच्यासाठी बोलावं लागेल. आम्ही शांत बसून समाजाला लीड करणारे लोक आहोत. कोणी आम्हाला खुलेआम धमकी देत असेल तर उत्तर द्यायला सक्षम आहे, असं वक्तव्य नवनीत राणांनी केलंय.


माझा उद्देश स्पष्ट आहे. हिंदूस्थानमध्ये हिंदू विचारधारेला धरुन लोक राहतात त्याच्यावर जर कोण बोललं तर त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे, असं राणा म्हणाल्या. ओवेसींच्या आव्हानाला मी मोजत नाही. ते म्हणतात छोटा खूंखार आहे,पण असे खूंखार आम्ही घराच्या बाहेर पाळून ठेवतो, आता काय ते समजून घ्या, असं म्हणत नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूंना ओपन चॅलेंज दिलं आहे. तर, बच्चू कडू यांच्यासंदर्भात विचारलं असता  तोडी बहाद्दर लोकांवर मी बोलत नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं. 


अकबरुद्दीन ओवेसी यांच्या दहा वर्षांपूर्वीच्या 15 मिनिटं पोलीस हटवा य संदर्भातील एका वक्तव्यावरुन नवनीत राणा यांनी नवनीत राणांनी अकबरुद्दीन औवेसींच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत केवळ 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, मग दोन्ही भावांना कुठून कुठे पळावं हे समजणार नाही, असं म्हटलं होतं. यानंतर असदुद्दीन ओवेसींनी एक तास घेण्याचं आवाहन नवनीत राणा यांना दिलं होतं. यानंतर नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.


संबंधित बातम्या :


ओवैसी म्हणाले, माझा लहान भाऊ तोफ; नवनीत राणा म्हणाल्या असल्या तोफा आम्ही घरात सजावटीला ठेवतो


VIDEO : आम्हाला 15 सेकंद पुरे, नवनीत राणांचा ओवैसींना पुन्हा इशारा