Navneet Kaur Rana : अमरावतीमधील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. 2013 मधील  अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका विधानावरून ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली. “आम्हाला 15 मिनिटे नाही, तर 15 सेकंद लागतील”, असे त्या म्हणाल्या. राणांच्या वक्तव्याला  असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं, “मी तुम्हाला 15 सेकंद नाही, तर 1 तास देतो, तुम्ही काय करू शकता सांगा?” असं ते म्हणाले. नवनीत राणा यांच्या वक्तव्यावरुन सध्या राजकारण तापले आहे. यावरुन विरोधकांनी टीकेचा भडीमार केलाय. पण नवनीत राणा यांनी विरोधकांना उत्तर देताना, आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलेय. 


नवनीत राणा काय म्हणाल्या ? 


मी कुणालाही घाबरत नाही.  माझ्या वक्तव्यावर मी नेहमीच ठाम राहिलेली आहे. ओवैसी यांनी 15 मिनिटं फक्त पोलिसांना हटवून आम्हाला द्या असं म्हटलं होतं. पण हा हिंदुस्थान आहे, जे लोक हिंदू विचारधारेचे आहेत, त्यांना 15 सेकंदच लागतील.  






ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, त्या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाण आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असे राणा म्हणाल्या.


ओवैसी यांनी यांनी तीन तलाकला विरोध दर्शवला. महिलांच्या 33% आरक्षणालाही त्यांनी विरोध केला. आमची बाबरी आहे आणि राहणार या पद्धतीने भाषा करणारे हिंदुस्थानात राहतात आणि पाकिस्तानवर प्रेम करत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही. पाकिस्तानला शांत करण्यासाठी आमचे मोदीजी सक्षम आहेत, असं राणा म्हणाल्या.


 पाहा व्हिडीओ 



राहुल गांधींवर हल्लाबोल - 


 राहुल गांधी यांना प्रेमचे पत्र आणि प्रेमचे संदेश पाकिस्तानातून येत आहेत हे सर्वांना माहिती आहे. जोपर्यंत काँग्रेसचे सरकार होती तोपर्यंत पाकिस्तानच्या इशारावर राहुल गांधी व काँग्रेसने काम केले. पाकिस्तानी लोकांचा इथे चालणार नाही. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. मी हिंदुस्तानच्या मातीशी प्रामाणिक आहे. डोक्याला माती लावून आम्ही बाहेर निघतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आहे, जेव्हा मैदानात उतरलो तर तलवार कशी काढायची यासाठी आम्हाला विचार करण्याची गरज नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. 


असदुद्दीन ओवैसींचं राणांना प्रत्युत्तर


राणांच्या या टीकेला असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं . “15 सेकंद नाही, एक तास देतो. तुम्ही काय करू शकता सांगा? तुम्ही जास्तीत जास्त मुख्तार अन्सारीबरोबर जे झालं ते आमच्याबरोबर कराल. तुमच्यात किती माणुसकी शिल्लक आहे, मला बघायचं आहे. तुम्हाला कोण घाबरतं? आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आम्ही तयार आहोत. पंतप्रधान तुमचा, प्रशासन तुमचं, तुम्हाला कोणी अडवलंय? आम्हाला कुठं यायचं ते सांगा..आम्ही येऊ”, अशी प्रतिक्रिया दिली.