National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीने सलग तीन दिवस चौकशी केली आहे. तीन दिवसांत 30 तासांच्या चौकशीनंतर राहुलने आता ईडीकडून पुढील चौकशीसाठी सोमवारपर्यंत वेळ मागितला आहे. त्यांनी ईडीकडे एक दिवसाचा दिलासा मागितला आणि पुढील चौकशीसाठी सोमवारची वेळ द्यावी, असे सांगितले. असं असलं तरी ईडी सध्या राहुल गांधींच्या या मागणीवर विचार करत आहे. ईडीने त्यांना उद्या म्हणजेच शुक्रवारी तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यास सांगितले होते.


राहुल गांधी यांची आजची ईडी चौकशी संपली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने त्यांना शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले होते. सध्या त्याची इन कॅमेरा चौकशी सुरू आहे. आज राहुल गांधींना त्यांच्या यंग इंडिया स्टेकशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे सुमारे 35 प्रश्न विचारण्यात आले.


देशभरात काँग्रेसचे निदर्शने


राहुल गांधींची ईडीकडून चौकशी सुरू असताना दिवसभर चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सकाळपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जमू लागले होते. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापटही झाली. दरम्यान, पोलिसांनी काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रसह, जम्मूमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. जम्मूतील काँग्रेस कार्यालयाबाहेरून काँग्रेस कार्यकर्ते राजभवनाच्या दिशेने जात होते, मात्र त्याआधी पोलिसांनी संपूर्ण काँग्रेस कार्यालयाला बॅरिकेड लावून त्यांना अडवले. दरम्यान, ईडीविरोधात मुंबईत काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. हँगिंग गार्डन ते राजभवन अशा काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात काँग्रेस कार्यकर्ते खूपच आक्रमक दिसले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार, पोलिसांकडून सर्व नेत्यांची धरपरड आणि सुटका
Rahul Gandhi : देशातील युवकांच्या संयमाची 'अग्निपरीक्षा' पाहू नका; अग्निपथ योजनेवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा