Nashik News: सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर शुक्रवारी प्रथमच नाशिकमधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले आहेत. सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. आज उद्धव ठाकरेंना भेटायला दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी, सुनील बागुल ,माजी आमदार वसंत गिते, उप महानगर प्रमुख बाळा दराडे आणि इतर पदाधिकारी मातोश्रीवर उपस्थित होते. मात्र, पक्षावर नाराज असलेले विलास शिंदे आजही गैरहजर होते. कौटुंबिक कारणामुळे ते मातोश्रीवर येऊ शकले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी आणि मनसे -शिवसेना मनोमिलन या विषयावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाशिकचे पदाधिकारी काय चर्चा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Vilas Shinde Nashik: विलास शिंदेंच्या अनुपस्थितीची चर्चा
सुधाकर बडगुजर यांनी ठाकरे गटात अनेकजण नाराज असल्याचे त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. यावेळी त्यांनी विलास शिंदे यांच्या नावाचाही उल्लेख केला होता. बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली, त्या पत्रकार परिषदेतही विलास शिंदे हजर होते. मात्र, त्यांनी आपण ठाकरे गट सोडणार नसल्याचे वृत्त फेटाळले नव्हते. त्यानंतर आज विलास शिंदे मातोश्रीवरी उद्धव ठाकरे यांना भेटायला आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे कार्यकर्त्यांमधील वाद उफाळला
ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. मात्र, नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला जात आहे. नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांच्यातील वाद वाढला आहे. बडगुजर यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याने अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टमध्ये तीन कुत्रे आणि खाली मराठीत दोन टॉमी आणि एक मामी असा उल्लेख करण्यात आला आहे. ही पोस्ट भाजप आमदार सीमा हिरे यांना उद्देशून टाकल्याने पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अंकुश शेवाळे, गणेश दराडे आणि धीरज राजपूत या तिघांचा समावेश आहे.
आणखी वाचा