Naresh Mhaske, Delhi : "मागच्या सत्रात म्हणालो होतो की राहुल गांधी यांच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे त्यांचा राहू काळ सुरू झाला आहे. आणि आता त्यांच्या कृपेने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचाही राहू काळ सुरू झाला आहे", असं ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. ते लोकसभेत बोलत होते. 


नरेश म्हस्के म्हणाले, काँग्रेसचा हात , ज्या पक्षावर पडतो, तो उभा राहत नाही, संपतो. उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी त्यांची मशाल काँग्रेसच्या हाती दिली, त्या दिवशीच त्या मशालीच्या आगीत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वालाही जाळलं. त्याचा परिणाम असा झाला की आज त्यांना काँग्रेसच्या मतदारांवर अवलंबून राहावं लागत आहे.


दुसरीकडे, आपले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनुष्यबाण अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 80 लाख लोकांनी शिवसेनेला मत दिलं, कारण आम्ही हिंदुत्व वाचवण्याचं काम केलं आहे. याशिवाय, संविधानाने दिलेली जबाबदारी, लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना, आपला दवाखाना, समृद्धी महामार्ग आणि कोस्टल रोड अशा योजनांद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.


2014 ते 2024 दरम्यान बँकांच्या शाखांमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. मार्च 2014 मध्ये एकूण 1,17,990 शाखा होत्या, ज्यांची संख्या आता 1,65,501 वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातील शाखांची संख्या 41,855 वरून 55,372 झाली आहे. सेमी-अर्बन शाखा 32,504 वरून 45,314 पर्यंत वाढल्या, तर शहरी भागातील शाखा 21,007 वरून 29,276 वर गेल्या आहेत. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक समावेशन अधिक मजबूत झाले आहे.


पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, आज 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून थेट त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात, जे कॅनडा आणि फ्रान्सच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थांना बळकटी मिळाली असून, 137 कोटी आधार क्रमांकांद्वारे प्रत्येक भारतीयाला डिजिटल ओळख देण्यात आली आहे.


आज भारत जागतिक स्तरावर आर्थिक प्रगतीचा ध्रुवतारा बनला आहे, रोजगारनिर्मितीतून नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, आणि ग्रामीण-शहरी भागांतील अंतर कमी कलं आहे. काँग्रेसने भारतावर राहु काळ आणला होता, पण महायुती आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत आहे. काँग्रेसच्या काळात ज्या जागतिक व्यासपीठावर भारताला दुर्लक्षित केलं जात होतं, त्या व्यासपीठावर आज भारत एक मजबूत, आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. महायुतीने देशाला राहु काळातून बाहेर काढून सशक्त आणि समृद्ध भारत उदयास आणला आहे, असंही म्हस्के म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे प्रेत; मृत्यूचं मोठं कारण समोर