Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशाभरातील खासदार आणि बॉलिवडू सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी पीएम मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ घेतली. नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली होती, त्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. 


पीएम मोदींनंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरींनी घेतली मंत्रिपदाची शपथ 


पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते. तर नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे. गृथ आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 






कोणत्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ?


1. अमित शाह
2. राजनाथ सिंह
3. नितीन गडकरी
4. निर्मला सीतारमन
5. जे.पी. नड्डा 
6. एस जयशंकर
7. मनोहरलाल खट्टर 
8. कुमारस्वामी
9. पियुष गोयल 


नरेंद्र मोदींना एनडीएचा पाठिंबा 


लोकसभा निवडणुकीत टीडीपी आणि जेडीयू किंगमेकर म्हणून पुढे आले आहेत. दोन्ही पक्षांच्या जोरावरच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. एनडीएमधील घटक पक्षांनाही मंत्रिमंडळात महत्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. नरेंद्र मोदींचे नव्या मंत्रिमंडळ तयार करताना महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


 






 


 


इतर महत्वाच्या बातम्या 


PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी संपन्न, तिसऱ्यांदा घेतली शपथ