PM Narendra Modi Oath Live Updates: पुणेकरांचा नेता मोदी कॅबिनेटमध्ये, रक्षा खडसे, रामदास आठवले, प्रतापराव जाधव यांचीही राज्यमंत्रिपदी वर्णी
Narendra Modi Oath Taking Ceremony live streaming : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. शपथविधीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : कर्नाटकच्या तुमकूरचे खासदार वी सोमन्ना, सर्वात श्रीमंत खासदार आणि टीडीपी नेते डॉ. चंद्रशेखर पन्नास्वामी, उत्तर प्रदेशच्या आग्राचे खासदार एसपी सिंह, बंगळुरु उत्तरच्या खासदार शोभा करंदलाजे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : भाजप नेते शंतनू ठाकूर, बी.एल. वर्मा, शोभा करंदलाजे, पंकज चौधरी, एस.पी. सिंह बघेल, भाजप नेते कृष्णा पाल आणि कीर्तीवर्धन सिंह यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
PM Modi Oath Ceremony Live : अपना दल (सोनेवाल) प्रमुख आणि मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असून मागील सरकारमध्ये मंत्री होत्या.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: रक्षा खडसे यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. खरगे यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
PM Narendra Modi Swaring Ceremony Live Updates : जेडीयूचे खासदार रामनाथ ठाकूर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
PM Modi Oath Ceremony Live Updates : जितिन प्रसाद, श्रीपाद नायक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर यांनी स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
PM Modi Swearing-In Ceremony Live : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Ramdas Athawale Oath Ceremony Live : RPI अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
PM Modi Oath Taking Ceremony Live : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एक्स (X) मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.
PM Narendra Modi Cabinet : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये कोण-कोणत्या नेत्यांना संधी मिळाली आहे, त्यांची सविस्तर यादी पाहा.
Narendra Modi Oath Ceremony Live : शिवसेना नेते प्रतापराव गणपतराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) प्रमुख चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : गजेंद्र सिंह शेखावत आणि अन्नपूर्णा देवी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : बिहारमधील बेगुसरायचे खासदार गिरीराज सिंह, मागील सरकारमधील रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
PM Narendra Modi Cabinet Oath Ceremony : कर्नाटकमधून सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकलेले प्रल्हाद जोशी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony : सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan), जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi), राजीव रंजन सिंह (Rajiv Ranjan Singh) या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan), जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi), राजीव रंजन सिंह (Rajiv Ranjan Singh) या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
HD Kumaraswamy oath : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी मोदींच्या मंत्रिमंडळात
मनोहर लाल खट्टर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
Dr S Jaishankar takes oath : एस जयशंकर कॅबिनेट मंत्रिपदी शपथबद्ध!
निर्मला सीतारामण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली आहे.
Shivraj Singh Chouhan oath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा शपथविधी, मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान
JP Nadda oath video : जे पी नड्डा यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
Modi Cabinet Oath Ceremony Live Updates : भाजप नेते जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
Nitin Gadkari oath : नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली
Modi Cabinet Oath Ceremony Live Updates : नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Amit Shah oath video : मोदी कॅबिनेटमध्ये अमित शाह यांनी घेतली शपथ
Modi Cabinet Oath Ceremony Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली.
Modi Cabinet Oath Ceremony : राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
Rajnath Singh oath video live : राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, पाहा व्हिडीओ
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना पद आणि गोपनियतेची शपथ दिली
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates: नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
Narendra Modi Oath Ceremony Live Updates : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. आज मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होणारे मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. यासाठी राष्ट्रपती भवनात मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
Narendra Modi Oath Ceremony Live Updates : अजित पवार यांनी स्वत: पुढे येऊन सांगितलं आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस सध्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) देण्याची चर्चा होती, मात्र त्यांनी त्यास नकार दिला आहे. याचं कारण म्हणते राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्रीपद नाही तर कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. त्यामुळे तुर्तास राष्ट्रवादीचा मंत्रिमंडळात समावेश नाही.
PM Modi Oath Ceremony Live : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत. आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
पुण्याच्या खासदारांना जर मंत्रीपद मिळत असेल तर चांगला आहे मात्र ज्या प्रकारे घटना पुण्यात घडत आहेत त्यावर काहीतरी ॲक्शन घेणे गरजेचे आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख होती त्याला काळीमा फासण्याचा काम सत्ताधाऱ्यांनी केला आहे. ड्रग्स असेल ड्रंक अँड ड्राईव्ह असेल अशा अनेक घटना घडत आहेत . पाऊस पडला आहे पाणी तुम्हाला आहे त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे .
अडीच वर्षे झाले महापालिका निवडणुका नाहीत . हे खोके सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे . प्रशासकीय कामांमध्ये होतो कुठेही लक्ष सत्ताधाऱ्यांचा दिसत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (सेक्युलर) खासदार जीतन राम मांझी, आरएलडी प्रमुख जयंत चौधरी आणि भाजपच्या नवनिर्वाचित खासदार शोभा करंदलाजे शपथविधीसाठी उभारलेल्या मंचावर बसले आहेत. यासोबतच मोदी 3.0 मंत्रिमंडळात सहभागी होणारे इतर नेतेही राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पोहोचले आहेत. नरेंद्र मोदी संध्याकाळी 7.15 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
PM Modi Oath Taking Ceremony Live : नव्या मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजप नेत्या निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान आणि अश्विनी वैष्णव राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.
PM Modi Oath Ceremony Live : बिहारचे मुख्यमंत्री आणि JDU अध्यक्ष नितीश कुमार शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.
PM Modi Oath Ceremony Live : अभिनेते शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी राष्ट्रपती भवनात एकमेकांची गळाभेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे.
Narendra Modi Oath Ceremony Live Updates : आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
PM Modi Oath Ceremony Live : नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी अजित पवार राष्ट्रपती भवनात पोहोचले.
Narendra Modi Oath Ceremony Live Updates : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि अभिनेता अक्षय कुमार शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पोहोचले आहेत.
PM Narendra Modi Oath Ceremony Live Updates : अभिनेता शाहरुख खान आणि उद्योगपती मुकेश अंबानी नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पाहा LIVE
Narendra Modi Oath Ceremony Live Updates : भाजपचे नवनिर्वाचित खासदार अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.
Narendra Modi Oath Ceremony Live Updates : भाजपचे नवनिर्वाचित खासदार अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.
PM Modi Oath Ceremony Live : नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पंतप्रधान पदाथी शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्याला ट्रान्सजेंडरही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी तृतीयपंथीयांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. या शपथविधीमध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागातून 20 तृतीयपंथी राष्ट्रपती भवनात उपस्थित आहेत. यूपी सरकारमधील राज्यमंत्री सोनम किन्नर यांच्या नेतृत्वाखाली 20 तृतीयपंथी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.
Narendra Modi Oath Taking Ceremony: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी आणि चित्रपट निर्माते राजकुमार हिराणी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.
Narendra Modi Oath Taking Ceremony : मोदींच्या कॅबिनेटमधून पत्ता कट झालेले अनुराग ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं, ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पाचव्यांदा खासदार होणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मोदींच्या नेतृत्त्वात देश विकसित होईल आणि नवीन उंची गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Narendra Modi Oath Taking Ceremony : भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यामध्ये भाजपची निश्चितच फसवणूक होईल.
PM Modi Oath Ceremony Live : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी, राष्ट्रपती भवनात परदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, या कार्यक्रमासाठी देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, यां यादीत मन की बात मध्ये सहभागी झालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सहभाग आहे, मन की बात कार्यक्रमात नाशिकचे पर्यावरण प्रेमी चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचा आढावा मोदींनी घेतला होता आज त्यांनाही शपथविधी समारंभासाठी निमंत्रण देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कार्यलयातून त्यांना निरोप देण्यात आला होता.
Modi 3.0 Oath Cremony : NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज मोदींचा शपथविधी पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व नव्याने खासदार झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू दिल्ली विमानतळावर हजर झाले आहेत
PM Modi Cabinet : स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्हीके सिंह आणि अश्विनी चौबे या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही. तसेच अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आरके सिंह, अर्जुन मुंडा, निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे आणि भागवत कराड यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश नसेल, अशी माहिती आहे.
Modi Cabinet Oath Ceremony : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्मृती ईराणी, राजीव चंद्रशेखर यासह अनेक नेत्यांना महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याशिवाय अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय होते. दरम्यान, आता मोदी 3.0 मध्ये एकूण 20 नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये हे नेते सहभागी झाले नव्हते. यावरून त्यांचा यावेळी मोदी मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
PM Modi : यंदा मोदी 3.0 सरकारमध्ये कोणत्या चेहऱ्यांचा समावेश होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्यासोबत 65 नेते मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी करण्यात आली होती मात्र, एनडीएकडून एका राज्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. राष्ट्रवादीची मागणी मान्य न झाल्याने त्यांचा मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबला आहे. देंवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला माहिती देताना सांगितलं की, आमच्या वतीने राष्ट्रवादीला एक जागा देणार होतो. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आम्ही देणारं होतों. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांचं नाव त्यांनी सांगितलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा देण्यात आली होती. त्यांचा आग्रह कॅबिनेट आहे. आम्ही देत असलेले राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे देखील कॅबिनेट प्रमाणेच असतो. पुढच्या विस्तारात आम्ही राष्ट्रवादीचा समावेश करुन घेऊ, असंही फडणवीस सांगितलं आहे.
Ravindra Chavan : अयोध्येत महाराष्ट्र सदनाला जागा मंजूर झाली आहे. शरयू नदीजवळ 2 एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी, महाराष्ट्र सदनसाठी राज्य सरकारने विनंती केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
खासादर श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांचे भावी केंद्रीय मंत्री अशा आशयाचे फलक झळकले. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा असताना ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मनात मात्र वेगळच दिसून येत आहे. ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी पूर्व द्रुतगती मार्गावर हे बॅनर लावण्यात आले आहेत
Narendra Modi Oath Ceremony : एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट देणे अशक्य असल्याने मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबल्याचं समोर आले आहे. राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल इच्छुक उमेदवार आहेत. एकिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार असून देखील त्यांना केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळत असल्याने दुसरीकडे केवळ 1 खासदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद कस द्यायचा हा महायुती समोर प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही इच्छुक नेते हे वरिष्ठ असल्याने राज्यमंत्रीपद देण्यात देखील महायुतीला अडचणी आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्रिमंडळात सहभाग नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाल्यास घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता कारण देशात 1 सदस्य निवडून आलेले 7 पक्ष आहेत.
Narendra Modi Oath Ceremony : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून सोबत बुलढाणा जिल्ह्याचे खा प्रतापरावं जाधव हे केंद्रीय मंत्रपदाची शपथ घेणार असल्याने .. बुलढाण्यात महायुती कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला...
Narendra Modi Oath Ceremony : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर त्यांच्या पुण्यातील कार्यालयात जल्लोष साजरा केला जात आहे. मोहोळांचे कुटुंबीयांनी थेट दिल्ली गाठलीय आणि पुण्यातील कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे. फटाके फोडून फुग्यांची सजावट करण्यात आली आहे.
Narendra Modi Oath Ceremony : एका राजकीय घराण्यात मी सून म्हणून आले. नाथाभाऊ यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. माझ्या आयुष्यातील बरीच परिस्थिती बदलत गेली. त्या परिस्थितीत नाथाभाऊंनी मला खूप साथ दिली आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांसह सर्व जनतेने मला साथ दिली आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. इतकी मोठी संधी मला मिळत आहे, असे म्हणताना रक्षा खडसे भावूक झाल्याचे दिसून आले. मला कुठलीही अपेक्षा नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
Narendra Modi Oath Ceremony : नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान दिले जाणार नाही. भाजप हायकमांड कडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले.नारायण राणे एमएसएमई मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. त्यांना यंदा मंत्रिमंडळात संधी नाही.
पीटीआयच्या वृत्तानुसार, गृह, अर्ध, संरक्षण आणि विदेश मंत्रालयासारखी महत्वाची खाती भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शिक्षण आणि संस्कृतिक मंत्रालयाची कमानही भाजप खासदारांकडे जाऊ शकते. मित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पदे मिळू शकतात, असे मानले जात आहे. शिवराज सिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहर लाल खट्टर यांसारखे लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले माजी मुख्यमंत्रीही नव्या सरकारमध्ये सामील होऊ शकतात.
१. जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
२. जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
३. अनुप्रिया पटेल, अपना दल
४. डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
५. के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
६. नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
७. राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
८. अमित शाह, भारतीय जनता पार्टी
९. अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
१०. राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
११. एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
१२. सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
१३. चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
१४. मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
१५. पवन कल्याण, जनसेवा पार्टी (होल्ड)
१६. पियुष गोयल, भारतीय जनता पार्टी
१७. ज्योतिरादित्य शिंदे, भारतीय जनता पार्टी
१८. प्रतापराव जाधव, शिवसेना
१९. कमलजीत सेहरावत, भारतीय जनता पार्टी
२०. रक्षा खडसे, भारतीय जनता पार्टी
२१. रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
२२. के. अन्नामलाई, भारतीय जनता पार्टी (होल्ड)
२३. मनोहरलाल खट्टर, भाजप
२४. राव इंद्रजीत सिंह, भारतीय जनता पार्टी
२५. सुरेश गोपी, भारतीय जनता पार्टी
२६. ज्युएल ओरम, भारतीय जनता पार्टी
२८. मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टी
२९. किशन रेड्डी, भारतीय जनता पार्टी
३०. बंडी संजय कुमार, भारतीय जनता पार्टी
३१. गिरिराज सिंह,भारतीय जनता पार्टी
३२. रवनीत बिट्टू,भारतीय जनता पार्टी
Narendra Modi Oath Ceremony : राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. आज ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Narendra Modi Oath Ceremony : "बऱ्याच काळानंतर टीडीपीला केंद्रीय मंत्री मिळणार आहे. आमची अद्याप कोणतीही मागणी नाही. आमचे संबंध इतके मजबूत आहेत की आम्ही योग्य तो विचार करूनच कोणताही निर्णय घेऊ. आम्ही खूप आहोत. मुस्लिम आरक्षणाबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. आतापर्यंत आम्ही कोणताही मागणी केली नाही, असे टीडीपीचे खासदार राम मोहन नायडू किंजरपू म्हणालेत.
Narendra Modi Oath Ceremony : महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार यांच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याचीही चर्चा रंगली असताना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांना अद्याप कोणताही फोन आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला मंत्रिपदासाठी फोन येईल, याकडे नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्रातून नारायण राणे हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पीएमओ कार्यलयातून आठवले यांनाही फोन आला आहे.
Ramdas Athwale: रामदास आठवले यांना अद्याप मंत्रिपदासाठी कोणताही कॉल नाही. प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु असताना अद्याप त्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी कोणताही कॉल आला नाही आहे.
- सुनील तटकरे यांच्या घरी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा बैठकीला सुरवात झाली आहे
- या बैठकीत सुनील तटकरे,अजित पवार आणि छगन भुजबळ हे बैठकीत आहेत
- त्यामुळे एनसीपीकडून आज कोण मंत्रिपदाची शपथ घेणार की नाही यात शंका आहे
Prataprao Jadhav: शिवसेनेकडून प्रतापराव जाधव शपथ घेण्याची शक्यता आहे.प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचले आहे. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांना फोन गेल्याची माहिती मिळत आहे.
Narendra Modi Oath Ceremony Live Updates: मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ दिल्लीत पोहोचले आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जूही दिल्लीत आले आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी संभाव्य मंत्रिमंडळाशी चहापानावर चर्चा करणार आहेत.
Narendra Modi Oath Ceremony: शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन आलाय. ते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत.
Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्या निमित्ताने दिल्ली सजलेली आहे. राष्ट्रपती भवनाच्या समोर हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आला आहे. स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोदींचे बॅनर आणि कट आउट लावण्यात आले आहेत.
Sanjay Raut on Modi oth ceremony : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. एनडीएच्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. आज सायंकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडणार आहे. शपथविधीआधी शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधलाय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबतही त्यांनी मोठा दावा केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय.
Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एनडीएचे नेतेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी पीएमओ कार्यलयातून त्या खासदारांना फोन गेले आहेत. त्यामध्ये खालील नेत्यांचा समावेश आहे.
जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
अनुप्रिया पटेल, अपना दल
डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
अमित शाह, भारतीय जनता पार्टी
अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
पवन कल्याण, जनसेवा पार्टी
पियुष गोयल, भारतीय जनता पार्टी
ज्योतिरादित्य शिंदे, भारतीय जनता पार्टी
Narendra Modi Oath Ceremony: जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव जिल्ह्याच्या नवनिर्वाचित भाजपाच्या खासदार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीमधे दाखल झाल्या आहेत. रक्षा खडसे या तिसऱ्या वेळी खासदार झाल्याने त्यांना मंत्रीपद मिळावे अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे.
Praful Patel: उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे यांच्या भेटीसाठी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अद्याप मंत्रीपदाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. प्रफुल पटेल यांना अद्याप मंत्री पदासाठी फोन आलेला नाही.
Narendra Modi Oath Ceremony: टीडीपी खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापु राम मोहन नायडू यांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. या दोन्ही नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. पेम्मासानी सर्वात श्रीमंत खासदार आहेत.
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी शपथविधीसंदर्भात एक सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये प्रवाशांना राष्ट्रीय राजधानीतील काही रस्ते आणि मार्ग बंद करण्याबाबत सतर्क करण्यात आले आहे. 1100 वाहतूक पोलीस कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत अनेक रस्ते बंद राहतील. यामध्ये संसद मार्ग (परिवहन भवन आणि टी-पॉइंट रफी अहमद किडवाल मार्ग दरम्यान), नॉर्थ अव्हेन्यू रोड, साउथ अव्हेन्यू रोड, कुशक रोड, राजाजी मार्ग, कृष्णा मेनन मार्ग, तालकटोरा रोड आणि पंडित पंत मार्ग यांचा समावेश आहे.
Narendra Modi Oath Ceremony: जीतन राम मांझी, जयंत चौधरी आणि अनुप्रिया पटेल यांना पीएमओ कार्यालयातून फोन गेला. फोनवरून सांगण्यात आले की त्यांना मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल. आज संध्याकाळी घेतील मंत्रिपदाची शपथ
Narendra Modi Oath Ceremony: सलग चौथ्यांदा निवडून आलेले खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. 1997 नंतर तब्बल 22 वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळणार आहे. नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदे यांनी ही भेट जिल्ह्याला दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात मोठी भर पडणार आहे. कित्येक वर्षापासून रखडलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग, नदीजोड प्रकल्प व एम आय डी सी प्रश्न मार्गी लागणार आहे त्यामुळे मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे, असे संजय गायकवाड म्हणाले.
Narendra Modi Oath Ceremony: राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. नरेंद्र मोदी सकाळी आज राजघाटावर पोहोचले. त्यांनी येथे राष्ट्रपिता यांना आदरांजली वाहिली. नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता शपथ घेणार आहेत.
Narendra Modi Oath Ceremony Updates: आजच्या शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदी दिल्लीतील अटल स्मारकावर पोहोचले आणि येथे त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. नरेंद्र मोदी संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार आहेत.
Narendra Modi Oath Taking Ceremony: एनडीए सरकार शपथविधीसाठी भारतीय उपमहाद्वीप मधील 9 देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं आहे. 2014 मध्ये मोदी यांनी बिम्स टेक च्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केलं होतं. 2019 ला मोदी यांनी सार्क राष्ट्राच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. तर यावेळेला भारताच्या शेजारी असणाऱ्या सर्व राष्ट्रांना निमंत्रीत केलं आहे.
येणारे प्रमुख पाहुणे
शेख हसीना, पंतप्रधान, बांग्लादेश
रनिल विक्रमासिंघे, राष्ट्रपती श्रीलंका
डॉ. मोहम्मद मुइज्जू, राष्ट्रपती मालदीव
प्रविंदकुमार जगन्नाथ, मॉरिशस
पुष्प कमल दहेल प्रचंड, पंतप्रधान नेपाळ
शेरींग तोबगे, पंतप्रधान भूटान
अहमद अफीफ, राष्ट्रपती सेशल्स
मोदींच्या कॅबिनेटमध्ये 19-20 कॅबिनेट मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.भाजपच्या नेत्यांसोबत यामध्ये नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू आणि पासवान यांच्या पक्षातील नेत्यांचा समावेश असेल. अमित शाह, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, एस जयशंकर, अश्विनी वैष्णव, ललन सिंह, रामनाथ ठाकूर, चिराग पासवान, जीतन मांझी, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रल्हाद जोशी, रिरिजा सिंह, नित्यानंद राय, ज्योतिरादित्य शिंदे, मनसुख मंडविया, अनुराग ठाकूर, किरन रिजीजू, डॉ. जितेंद्र सिंह, सुरेश गोपीनाथ, शिवराज चौहान, फग्गनसिंह, कुलस्ते, शोभा करंदलाजे, खिसन रेड्डी, बंडी संजय, गजेंग्रसिंह शेखावत, अर्जुन मेघवाल हे आज मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता.
Narendra Modi Oath Taking Ceremony: एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आज मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनाला चार मंत्रिपदे मिळू शकतात. राज्यातील भाजपचे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेनकडून मिलिंद देवरा, संदीपान भुमरे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. रिपाइंकडून रामदास आठवले हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Narendra Modi Oath Taking Ceremony: थोड्याच वेळात नरेंद्र मोदी राजघाटावर पोहचणार आहेत. महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोदी राजघाटावर जाणार आहेत. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार मोदी आहेत.
पार्श्वभूमी
Narendra Modi Oath Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आज राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनीपद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली असून तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यासह मोदी कॅबिनेटमधील मंत्र्यांनीही शपथ घेतली.
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेव पंतप्रधान आहेत, जे देशाच्या स्वातंत्र्यानंतर सलग तीन निवडणुकांनंतरही पंतप्रधान पदावर विराजमान राहिले.
पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी नंतर राजनाथ सिंह यांनी मोदी कॅबिनेट 3.0 मधील पहिले मंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर अमित शाह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अमित शाह यांच्यानंतर नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
जे.पी.नड्डा (JP Nadda), शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan), निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman), कुमारस्वामी (Kumaraswamy), मनोहर लाल (Manohar Lal), डॉ. एस. जयशंकर (Dr S Jaishankar) या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -