Narendra Modi, Satara Meeting :" काँग्रेसने 40 वर्षांपासून सैनिक परिवारापासून वन रँक वन पेंशन पासून वंचित ठेवले. फक्त 500 कोटींचा झुनझुना दाखवला. डोळ्यात धुळ फेकण्यात आणि खोटं बोलण्यात काँग्रेस पक्ष मास्टर आहे. काँग्रेसने 60 वर्ष राज्य केले. मात्र, बाबासाहेबांचे संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. मात्र, आम्ही 370 आर्टिकल ध्वस्त करुन टाकले. मोदीने आर्टीकल 370 आर्टिकल हटवले", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 


नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, सातारा देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्रांपेक्षा कमी नाही. उदयनराजेंना तुम्ही येथे उमेदवार बनवले. साताऱ्यात भगवा फडकत राहिला आहे, आणि फडकत राहिला आहे. मी आज तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही तुमच्या सेवकावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मी आज इथे आलो आहे. एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी आल्या आहेत. 


 शिवाजी महाराजांच्या समाधीपासून मला प्रेरणा आणि उर्जा मिळाली


पुढे बोलताना पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले, 2013 मध्ये भाजपने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. तेव्हा मी रायगडच्या किल्ल्यावर गेलो होतो. कोणतेही काम सुरु काम करण्यापूर्वी मी शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी ध्यानस्थी होऊन बसलो होतो. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या समाधीपासून मला प्रेरणा आणि उर्जा मिळाली. त्यामुळेच मी गेल्या 10 वर्षात आदर्श विचारांची जगण्याचा प्रयत्न केला. काहीना काही करण्याचा प्रयत्न केला आहे. साताऱ्याची भूमी शूर वीरांची भूमी आहे. अपशिंगे गाव असो किंवा साताऱ्यातील कोणतेही गाव असो आत्मनिर्भर होत असलेल्या भारतीय सेनेला पाहून खूश आहे. 


फक्त भाजपचे केवळ दोनच खासदार होते


उदयनराजे भोसले म्हणाले, स्वातंत्र्य मिळालं तेव्हा प्रत्येक राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. फक्त भाजपचे केवळ दोनच खासदार होते. संपूर्ण जगभरातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली. कारण काँग्रेसने केवळ पोकळ घोषणा केल्या. केवळ मत मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाने घोषणा दिल्या. मात्र, नरेंद्र मोदींनी प्रत्येक घोषणेची अंमलबजावणी केली आहे. जवानांच्या बाबतीत योजना राबवल्या, त्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Narendra Modi : पद्मशाली समाजाचं मीठ खाऊन मोठा झालोय, या आधी सोलापूरला काहीतरी दिलंय, आता मागायला आलोय: पंतप्रधान नरेंद्र मोदी