पुणे : राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार आमने सामने येत नसल्याचं चित्र आहे. काही मतदारसंघात विजयासाठी सर्व प्रकारच्या मार्गांचा वापर केला जात असताना शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Seat) वेगळं चित्र पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao) पुन्हा आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अमोल कोल्हे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी दोन्ही नेते अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अमोल कोल्हे हे शिवाजीराव आढळराव  यांच्या पाया पडले. यानंतर शिवाजीराव आढळराव हे देखील अमोल कोल्हे यांच्या पाया पडले.


अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव एकत्र कसे आले?


पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, शिरुर, मावळ, बारामती या मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली आहे.  या सभेच्या पूर्वी शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हेंची पुन्हा एकदा भेट घडली. यावेळी आधी कोल्हेनी आढळरावांचे मग आढळरावांनी ही कोल्हेंचे पाय धरले. खेड विधानसभेत अखंड हरिनाम सप्ताहाला दोघे एकाचवेळी पोहचले. यावेळी हा प्रसंग घडला. खासदार अमोल कोल्हे यांनी ज्येष्ठत्व म्हणून पाय धरले असली तरी आढळरावांनी पाय धरण्यामागे त्यांना कोल्हेचा आलेला पूर्वानुभव तर नसेल ना? अशी चर्चा यानिमित्ताने रंगलेली आहे. 



अमोल कोल्हेंचं शिवाजीराव आढळराव यांच्यासमोर दमदार भाषण


खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांच्या समोरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. 2014 मध्ये गॅसचे दर चारशे रुपये होतं, त्या गॅसला नमस्कार करून मतदानाला जा असं मोदी म्हणाले होते. आता तर गॅसचे दर अकराशे बाराशे रुपये झालेत. मग आता तीनवेळा नमस्कार घालून मतदानाला जा. असं म्हणत मोदींच्या जुन्या वक्तव्याची आठवण पुण्यातील सभेदिवशीच कोल्हे यांनी लोकांना आढळरावांसमोर करून दिली. शेतकऱ्यांनी मतदानाला जाताना दिल्लीच्या सीमेवर जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांचं स्मरण करावं, ज्यांच्या मुलानं शेतकऱ्यांच्या अंगावार गाड्या घातल्या त्यांचे वडील मोदींच्या मंत्रिमंडळात होते, हे विसरू नका, असं अमोल कोल्हे म्हणाले.


अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव यांच्या पाया पडले होते. 


संबंधित बातम्या :


भाजपकडून मलाच उमेदवारी! नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांचा दावा कायम, उमेदवारी अर्जही घेतला

 

कारखाना वाचत असेल तर मी कुठेही जायला तयार; फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं सूचक वक्तव्य