Narendra Modi, Interview : "देश विचारायचा माशांना पकडता, पण मगरीला हात घालत नाहीत. आता ईडी किंवा सीबीआय हे काम करत आहे, तर त्यांचा सार्वजनिक सन्मान झाला पाहिजे. कॅमेरासमोर नोटांचे डोंगर दिसतात. याला तुम्ही नाकारु कसे शकता. 2004 ते 2014 पर्यंत 34 लाख रुपये ईडीने जप्त केले होते. 2014 ते 2014 ईडीने 2200 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. 70 टेम्पो लागतील उचलून घ्यायला. आता हे सर्व देश पाहात आहे. आता तुम्ही शिव्या देऊ शकत नाही. चुकीचे झालंय असं म्हणू शकत नाहीत. आता मोठे मोठे लोक जेलमध्ये आहेत. कोण असेल कोण नसेल हे ना मला माहिती आहे, ना माझ्या यंत्रणेला माहिती आहे. ते फक्त कागदांना आणि फाईलींना माहिती आहे. ज्याने पाप केले आहे, त्यांना माहिती आहे आपला नंबर लागणार आहे", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 


सामान्य आयुष्यातही मी अनेक अपमान सहन केले आहेत


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी नेहमी सांगतो की,आम्ही कामदार आहोत, ते  नामदार आहेत. त्यामुळे आमच्या नशिबात शिव्या-शाप आणि अपमान लिहिलेले आहेत. हे राजकारणात आल्यानंतर म्हणतोय असं नाही. मी लहानपणापासून अशा प्रकारचे आयुष्य जगत आलो आहे. सामान्य आयुष्यातही मी अनेक अपमान सहन केले आहेत. त्यामुळे आम्ही सहन करु, असं मानतो. मी कप-प्लेट धुवायचो. माझ्या छोट्याशा दुकानात चहा पिणाराही मला खवळायचा. गार चहा दिला तर कानाखाली मारायचा, असंही पीएम मोदींनी (Narendra Modi) सांगितले. 


2002 मध्ये माझी ब्युरोक्रसी संपूर्णपणे माझ्याविरोधात होती


आचारसंहिता सुरु झाली की, या सिस्टिमच्या व्हॅकेशन सुरु होतात. मी यावेळी पाहातोय. माझी संपूर्ण टीम काम करत आहे. मी सर्वांना मोठा टास्क दिलेला आहे. ते असं काम करतात जणू आजच सरकार बनले असावे. याचा अर्थ असा की, माझी टीम संपू्र्ण उत्साहाने काम करत आहे. 2002 मध्ये माझी ब्युरोक्रसी संपूर्णपणे माझ्याविरोधात होती. त्यांना वाटतच नव्हते मी विजयी होऊ शकतो, असंही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले. 





इतर महत्वाच्या बातम्या 


Narendra Modi : लहानपणापासूनच शिव्या शाप वाट्याला, दुकानात थंड चहामुळे लोक कानाखाली मारायचे : नरेंद्र मोदी