Ashok Chavan, Nanded : विधानसभेच्या निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक (Nanded Loksabha Election) होणार आहे. काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिवंगत खा. वसंतराव चव्हाण (Vasant Chavan) यांच्या मुलाला जाहीर केली आहे. परंतु, भाजपाकडून अद्यापही लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. लोकसभेसाठी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाची चर्चा होती. परंतु चिखलीकर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आणी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी सुद्धा मिळाली आहे. 


अशोक चव्हाण बिनविरोध निवडून येतील : प्रताप पाटील चिखलीकर 


नांदेड लोकसभेचा उमेदवार कोण असा प्रश्न विचारला असता ज्याला उमेदवारी देतील त्यांच्यासोबत मी असणार आहे, असं प्रताप चिखलीकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, "अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवली तरी विजय आहे आणि नाही लढवली तरी आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने विजय होणार आहे. पण अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवली तर काही विषयच नाही. ते बिनविरोध निवडून येतील असा विश्वास माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केलाय. 


गेल्या लोकसभेत कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार ?


लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघाचा निकाल काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांच्या बाजूने लागला. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने नांदेडमध्ये भाजपला सपशेल पराभव स्वीकारावा लागला. कोणत्या पक्षाकडून कोणते उमेदवार उभे होते? नांदेडमधील लोकसभेतील प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच दिसून आली. भाजपकडून प्रतापराव चिखलीकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी मोठा विजय मिळवला होता. तर बहुजन भारत पार्टीकडून हरि पिराजी भोयाळे इंडियन नॅशनल लिगकडून  कौसार सुलताना यांचाही पराभव झाला.


नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच 


राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभेची निवडणूक होणार असल्याचे जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी नांदेड लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या


Mahayuti Seat Sharing : महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 153 जागा लढवणार, अजितदादा आणि शिंदेंची शिवसेना किती?


Sanjay Raut on Amit Thackeray : अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य; माहीममध्ये मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता