Mahayuti Seat Sharing : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केलीय. महाविकास आणि महायुती दोन्ही आघाड्यांतील पक्षांकडून उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून सर्वात प्रथम 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भाजपने आत्तापर्यंत कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सर्वांत जास्त लढण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 153 जागा लढवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 


महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेंच सुरु आहे. महाविकास आघाडीतही अनेक जागांवरुन खल सुरु आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. पुढील फॉर्म्युल्यानुसार महायुती निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपात पुन्हा एकदा भाजपकडून 9 आकड्याचे गणित जुळण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजप मुंबईत 18 जागा लढवणार आहे. भाजपकडून 14 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत, तर अद्यापही 4 जागांवर उमेदवार निश्चिती बाकी आहे. 


मुंबईतील भाजप कोणत्या जागा लढवणार ? 


बोरीवली 
दहिसर
कांदिवली पूर्व
चारकोप
गोरेगाव
वर्सोवा 
अंधेरी पश्चिम 
मुलुंड 
घाटकोपर पश्चिम
घाटकोपर पूर्व 
विलेपार्ले 
वांद्रे पश्चिम 
सायन-कोळीवाडा 
वडाळा 
मलबार हिल 
कुलाबा 
कलिना 
मालाड पश्चिम


महाविकास आघाडीत जागा वाटप कुठपर्यंत?


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आज (दि.26) दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 23 जणांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत 48 नावे जाहीर केली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाने आतापर्यंत 71 उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 196 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  23 ऑक्टोबरलाच तिन्ही पक्षांनी 85-85-85 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा फॉर्म्युला महाविकास आघाडीने जाहीर केला आहे.  घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून फक्त दोन दिवसांचा अवधी असताना अजूनही 92 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आलेली नाहीत. 


मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी भाजपचे प्रयत्न


माहिम पाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देणार


विश्वसनीय सूत्रांची माहिती


अमित ठाकरेंसोबत बाळा नांदगावकरांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sharad Pawar NCP Candidate list : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; छगन भुजबळांविरोधात उमेदवार ठरला,माळशिरस, परांड्यात कोणाला तिकीट?


Sharad Pawar NCP Candidate 2nd List 2024: खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का