मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi)  पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.  विधान परिषदेच्या (Vidhan Parishad)  निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये (Congress ) तीव्र संताप आहे. लोकसभेप्रमाणेच  ठाकरे गटाने  विधान परिषदेच्या चारही जागा परस्पर घोषित केल्याने  काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी विधानपरिषदेचे उमेदवार मागे घ्या, असा निरोप दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. 


महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याच्या आधी चर्चा केली पाहिजे होती अशी काँग्रेसची भूमिका आहे.  मुंबईतून विधानपरिषदेसाठी अर्ज भरलेले शिवसेना उबाठाचे उमेदवार ठाकरेंनी कायम ठेवावेत. मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक उमेदवार ठाकरेंनी मागे घ्यावेत,असा निरोप नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.  चारही ठिकाणी चर्चा न करता उमेदवार दिल्याने काँग्रेसमधे नाराजी आहे.   उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त आहेत.


पटोलेंचा फोन घेणे ठाकरेंनी टाळले? 


नाना पटोले म्हणाले, ते लंडनमध्ये गेले त्यावेळी देखील फोन केला. त्याचवेळी मी त्यांना म्हणाले दोन जागा तुम्ही लढा दोन जागा मी लढतो. त्यावेळी ते म्हणाले तुमचे उमेदवार कोण आहेत? मग मी उमेदवारांची नावे सांगितली. मूळ प्रश्न आहे की, चर्चा करुन जागावाटप केले असते तर या चारही जागा निवडून येणे सोपे झाले असते.  मी सकाळपासून त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे.मात्र त्यांचे ऑपरेटर आमच्या ऑपरेटरला साहेब तयार होत आहेत असाच निरोप देत आहे. माझ्याशी काय उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला नाही. त्यामुळे नेमके त्यांच्या मनात  काय आहे हेच कळत नाही. 


महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवावी ही काँग्रेसची भूमिका : नाना पटोले


आम्ही मुंबईत उमेदवार दिले नाही. परस्पर त्यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले. 


कोकण आणि नाशिकसाठी काँग्रेस आग्रही


कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र लोकसभा जागा वाटपाच्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार घोषीत केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र संताप आहे. मुंबईची जागा काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडण्यास तयार आहे. मात्र कोकण आणि नाशिकसाठी काँग्रेस आग्रही आहेत. 


Video : 



हे ही वाचा :


Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजीनाट्य; विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये तीव्र संताप