मुंबई:  शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP)  रौप्य महोत्सवी वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला.या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या  नवनिर्वाचीत आठ खासदारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट मंचावर एन्ट्री केली.खासदार बजरंग सोनवणे हे उशिरानं आल्यानं त्यांना फेटा बांधण्यात आला नव्हता. बजरंग सोनवणे मंचावर येताच जयंत पाटलांनी स्वतःचा फेटा काढून बजरंग सोनवणेंना घातला. जयंत पाटील यांच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  


महराष्ट्रात  फेटा हा शुभ किंवा धार्मिक प्रसंगाच्या दिवशीच घालण्यात येतो.  पूर्वीच्या काळात फेटा हा वरिष्ठ व्यक्तीच घालत होते. आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  फेटा बांधला जातो.  लोकसभा निवडणुकीचा राज्यातील निकाल अनेक अर्थांनी धक्कादायक होता.  बीडमध्ये झालेल्या हायव्होल्टेज लढतीत राष्ट्रवागी काँग्रेस शरद पवार गटाचे  बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पकंजा मुंडेंचा पराभव केला आहे. शेवटच्या लढतीपर्यंत ही लढत अत्यंत चुरशीची ठरली. बीडच्या लढतीत मराठा फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. 


बीडमधील उलटफेरामुळे भाजपला जबर धक्का बसला आहे. बीड हा भाजपचा मराठवाड्यातील बालेकिल्ला होता. गोपीनाथ मुंडे यांनी हा मतदारसंघ भक्कम तटबंदीने सुरक्षित केला होता. त्याचे त्यांनी अनेकदा नेतृत्व केले होते. पण या गडाला सुरुंग लावण्यात बजरंग बाप्पा सोनवणे यांना यश आले. यावेळी तर सर्व समीकरणं जुळालेली असताना अचानक बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आणि विजय  खेचून आणला. त्यामुळे बजरंग सोनवणेंचा विजय हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो. लोकसभा निवडणूक निकालानंतर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पत्रकार परिषद झाली त्यावेळी देखील जयंत पाटील यांनी बजरंग सोनवणेंचा जायंट किलर असा उल्लेख केला होता. आता  थेट स्टेजवर  जयंत पाटील यांनी आपला फेटा घातल्याने सोनवणेंचा विजय ह माईलस्टोन ठरला आहे.


बीडच्या विजयानंतर बजरंग सोनवणे अडीच वाजता जरांगे पाटलांच्या भेटीला


बीडच्या विजयानंतर बजरंग सोनवणे रात्री अडीच वाजता जरांगे पाटलांच्या भेटीला गेले होते. बीडमध्ये विजय मिळाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी रात्रीच अंतरवाली सराटी गाठून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. रात्री अडीच वाजता बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे बीडमध्ये जरांगे फॅक्टरने बजरंग सोनवणे यांची ताकद वाढवल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे


Video :