मुंबई : सरकारने आरक्षण (Maratha Reservation)  दिलं नाही तर विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election)  लढवणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)   दिलाय. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.  हे फडणवीसांचं पाप आहे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole)  हाणलाय. 2029 पर्यंत मोदी आणि फडणवीस सरकार जातीनिहाय जनगणना करणार नाही. त्यामुळे ते आरक्षण देऊ शकणार नसल्याचं पटोलेंनी म्हटलंय. राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आरक्षणाचा तिढा सुटला असता असा दावाही पटोलेंनी केला आहे. ते पालघरमध्ये बोलत होते. 


नाना पटोले म्हणाले,  हे फडणवीसांचे पाप आहे.  2029 पर्यंत मोदी आणि फडणवीस सरकार जातीनिहाय जनगणना करणार नाही . त्यामुळे ते आरक्षण देऊ शकणार नाही.  राज्यात आणि देशात जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा मोदी आणि राज्यात फडणवीस सरकारकडून प्रयत्न होत आहे.  नरेंद्र मोदी हे चुकून पुन्हा पंतप्रधान झाले. राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर हा आरक्षणाचा तिढा सुटला असता. 


देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर काँग्रेस चिखलफेक आंदोलन करणार : नाना पटोले


राज्यातील सरकार हे बातांचे सरकार  आहे.  राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली . आज भाजपने ज्या पद्धतीने आंदोलन केली त्याच उत्तर म्हणून येत्या शुक्रवारी राज्यभरात तालुका तालुक्यात भाजप कार्यालयांसमोर आणि नागपूरला देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर काँग्रेस चिखलफेक आंदोलन करणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले. 


मुठभर लोकांच्या आणि गुजरातच्या इशाऱ्यावर चाललेलं हे सरकार : नाना पटोले


पालघरच्या नैसर्गिक संपत्तीला खराब करण्याच काम राज्यातील माजलेलं सरकार करू पाहत आहे . मुठभर लोकांच्या आणि गुजरातच्या इशाऱ्यावर चाललेलं हे सरकार आहे . सर्वसामान्य लोकांचा विचार न करता हे बंदर उभारू पाहतय, असेही पटोले म्हणाले. 


आरक्षण न दिल्यास जरांगेंचा प्लॅन


लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा, म्हणजेच जरांगे फॅक्टरचा महायुतीला सर्वात मोठा फटका बसला. आता मनोज जरांगेंनी विधानसभेच्या 288 जागांची चाचपणी सुरू केली असून 127 मतदारसंघाचा सर्व्हे देखील पूर्ण केलाय. सध्या  संभाजीनगरमध्ये उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत हा बॉम्ब फोडलाय. जरांगे स्वतः निवडणूक
लढवणार नाही. पक्ष काढण्याबाबत  अद्याप निर्णय नाही, असेही ते म्हणाले. 


हे ही वाचा :


मोठी बातमी : मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा निवडणूक लढवणार, 127 जागांचा सर्व्हे पूर्ण!