छत्रपती संभाजीनगर : सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. खुद्द जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलंय.
मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मी वेळ दिलेला नाही, सरकारने वेळ घेतला आहे. मी अगोदर देखील सांगितले होती की, आम्ही तयारी करतोय. माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. आम्ही शोध घेत आहे. आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे. इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे.
मी स्वतः निवडणूक लढवणार नाही : मनोज जरांगे
सरकारने आरक्षण दिल नाही तर जरांगे विधानसभा निवडणुकीत लढवणार आहे. 127 मतदारसंघात पहिला सर्व्हे केला आहे. इतर मतदारसंघात आणखी दुसरा सर्व्हे करणार आहे. आरक्षण नाही दिले तर वेळ आली तर जरांगे मराठा, मुस्लिम आणि दलित , लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार आहे. मी स्वतः निवडणूक लढवणार नाही . स्वतःचा पक्ष की अपक्ष हे अजून ठरवलं नाही. मी सर्व मतदारसंघात जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात शांतता जनजागृती रॅली काढणार
6 जुलैपासून मराठवड्यात प्रत्येक जिल्ह्यात शांतता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. 6 जुलै हिंगोली, 7 जुलै परभणी,
8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड 12 जुलै जालना, 13 जुलै संभाजीनगर जिल्ह्यात रॅली असणार आहे.
जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार उभे करू : प्रकाश शेंडगे
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले, विधानसभा कोणी लढवावी कोणी नाही हा ज्याला त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे यामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही. मराठा समाजाला सरकारने टिकणारे 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाची अंमलबजावणी केली असून सरकारने ते आरक्षण घेण्यास मराठा समाजाने देखील सुरुवात केली आहे. ओबीसीमधील ज्या काही 375 जाती आहेत, त्या अत्यंत मागासलेल्या आहेत. ते आरक्षण जरांगे यांना काढून घ्यायचं आहे. मराठा समाजाला आम्ही आमचा मोठा भाऊ मानतो. पण गरीब समाजातील आरक्षण काढून घेतलं तर हा समाज गप्प कसा बसेल? मराठा समाजाला गरिबी आली असं म्हटलं जातंय, पण ही गरिबी त्यांच्यावर कोण आणली? त्यांच्याकडेच सर्व सत्ता, बँका आहेत. आरक्षण हा विषय गरिबी हटवण्याचा कार्यक्रमम नाही, तो सामाजिक आहे. जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी उमेदवारही उभा राहतील, आमचं बहुमत आहे. 60 टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही 80 टक्के जातो. आमचेही 199 मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाले असून आम्हीही तशीच भूमिका घेऊ शकतो.
हे ही वाचा :
Manoj Jarange: लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप