Prakash Ambedkar on Nana Patole, Akola : "नाना पटोलेंच्या आयुष्यातील दुर्दैवाचा दिवस आहे, असं मी मानतो. आम्ही सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दोन जागांवर पाठिंबा द्या, असं कळवलं. त्यानंतर कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेवर आम्ही पाठिंबा जाहीर केला. आमच्या पाठिंबामुळे कोण विजय होणार आणि कोण पराभूत होणार हा भाग वेगळा आहे. मात्र,नाना पटोलेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये काँग्रेस उमेदवार विजयी होणार म्हणून त्यांना प्रचंड दु:ख झालं", असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


काँग्रेसने भंडारा-गोंदियातून लोकसभा निवडणूक लढण्यास सांगितली होती 


आम्ही नागपूरच्या जागेवर पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोले म्हणाले की, वंचितने नितीन गडकरींना पराभूत करण्यासाठी पाठिंबा दिलाय. नाना पटोले आणि भाजप नेत्यांमध्ये असणारे संबंध यातून खुले झाले. ओपन झाले. नाना पटोले यांना काँग्रेसने भंडारा-गोंदियातून लोकसभा निवडणूक लढण्यास सांगितली. मात्र, त्यांनी मला लढता येणार नाही, असं सांगितलं. नाना पटोलेंनी लढण्यास कशामुळे नकार दिला. याचे खरे कारण आज आपणा सर्वांसमोर आले आहे. 


 नितीन गडकरी पराभूत होतील, याचे दु:ख नाना पटोले यांना झाले


काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांचा छुपा संबंध भाजप नेत्यांशी आहे. तो आज उघड झाला. आपला उमेदवार जिंकेल, याच्यापेक्षा नितीन गडकरी पराभूत होतील, याचे दु:ख नाना पटोले यांना झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन जागांवर पाठिंबा द्यावा, यासाठी डायरेक्ट आमच्यासाठी संपर्क केला. याचे दु:ख पटोलेंना झाले आहे. 


नाना पटोले आणि भाजपचं नातं चव्हाट्यावर आलं


नाना पटोले आणि भाजपचं नातं चव्हाट्यावर आलं आहे. एवढच फक्त सामान्य माणसाने लक्षात घ्यावे. वंचित जर काँग्रेस बरोबर गेली असती तर भाजप नेते पराभूत झाले असते. हे नाना पटोलेंना नको होतं. म्हणून वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवण्यात आलं अशी परिस्थिती आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


धाराशिवमध्ये ओमराजेंविरोधात कोण लढणार? मुंबईत हालचालींना वेग; राणा जगजीत सिंह पाटील फडणवीसांच्या तर सुरेश बिराजदार अजितदादांच्या बंगल्यावर